शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देमतदार नोंदणी कार्यक्रम । त्रुटी दूर न केल्यास नोंदणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या सर्वसाधारण मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार ८६२ नागरिकांनी तालुकाकचेरीतील निवडणूक विभागाकडे नाव नोंदविणे, नाव कमी करणे, नावात दुरूती करणे, पत्ता किंवा यादी भाग क्रमांक बदलविण्यासाठी रितसर अर्ज केले आहेत. सदर अर्जांची छानणी युद्धपातळीवर सुरू असून ७५७ अर्जामध्ये विविध त्रुट्या आढळून आल्याने अर्जदारांना एसएमएस करण्यात आले आहेत. सदर त्रुटींची पूर्तता वेळीच न केल्यास अर्जदाराला मतदानापासूनच वंचित राहवे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या नव्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार १२ एप्रिल २०२० पर्यंत नागरिकांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून २० फेबु्रवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी १ हजार ८४०, नाव कमी करण्यासाठी ४ हजार ४९२, नावात दुरूस्तीसाठी ३ हजार ९६७ तर पत्ता किंवा यादी भाग बदलासाठी ५६३ व्यक्तींनी आॅफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. या अर्जाची छानणी सध्या युद्धपातळीवर होत असून ७५७ अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. ज्या व्यक्तीच्या अर्जात त्रुटी आढळली त्या व्यक्तीस त्रुटीबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.५७२ व्यक्तींनी सादर केली नाही ‘रेफरन्स कॉपी’मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अनेक व्यक्ती करतात. पण ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने रेफरन्स कॉपी तालुक्याच्या निवडणूक कार्यालयात वेळीच सादर करणे क्रमप्राप्त आहेत. पण ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अर्ज करणाऱ्या ५९२ व्यक्तींपैकी सुमारे ५७२ अर्जदारांनी रेफरन्स कॉपीच वर्धा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर केलेले नाहीत. रेफरन्स कॉपी न सादर करणाऱ्यांची त्रुट्यांअभावी नोंदणीच होणार नसल्याचे सांगण्यात आले.मतदान केंद्रांवर होताहेत याद्या प्रसिद्धतालुका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून अर्ज नमुना सात प्राप्तचे नमुना १० मधील २८ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर नमुना आठ प्राप्तचे नमुना ११ मधील ७१ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहे.नव मतदारांची नोंदणी व्हावी. शिवाय अचूक मतदार यादी तयार व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेवरून मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. ज्या अर्जात त्रुट्या आढळल्या त्या अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यांनी त्रुट्यांची वेळीच पूर्तता करणे क्रमप्राप्त आहे.- भगवान वनकर, नायब तहसीलदार, निवडणूक वर्धा.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान