शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सायकल यात्रेतून आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो. 

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सायकल चालवा, आपले आरोग्य आणि पर्यावरण चांगले ठेवा, असा संदेश सायकल चालवण्यातून यवतमाळ येथील तीन युवक देत आहे. रविवारी यवतमाळ येथून सायकलने महात्मा गांधींच्या आश्रमात येऊन नवी ऊर्जा व प्रेरणा घेऊन सायकलस्वार यवतमाळकडे रवाना झाले.जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो. पेट्रोलवर होणारा अनावश्यक खर्चही टाळता येतो. यातून एक ना अनेक फायदे होत असल्याने सायकल चालवण्याचा संदेश आम्ही या प्रवासातून देत असल्याची माहिती प्रफुल्ल सालुंके, सुरेश भुसांगे व लियाकत हुसैन यांनी दिली.प्रफुल्ल व लियाकत हे दोघे फिटनेस ट्रेनर असून सुरेश हे इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक आहे. तिघेही ३५ ते ५१ वर्षे वयोगटातील आहे. मागील तीन वर्षांपासून ते नियमित बापूकुटीला भेट देऊन नतमस्तक होतात.  मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तिघांनी  यवतमाळ ते सेवाग्राम असा  ६८.७६ कि.मी. अंतराचा पल्ला अवघ्या २ तास ४८ मिनिटे ४८ सेकंदांत पूर्ण करून नागरिकांमध्ये आरोग्यासह पर्यावरणाबाबत जनजागृतीपर संदेश दिला. यावेळी सायकलस्वारांनी आश्रमातील स्मारकांना भेट देत माहितीही जाणून घेत आश्रम परिसराची पाहणी देखील केली. 

 

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम