शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

जिल्ह्यात सर्वदूर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:36 IST

गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस.....

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : प्रशासनाने दिला तालुक्यांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला.जूनच्या दुसऱ्या व शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसह पावसाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण सुखावले असले तरी संततधार पावसामुळे जनजीवन बऱ्यापैकी विस्कळीत झाले होते. सदर दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शेतकरी सांगतात. तर जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या तसेच मध्यम जलाशयामधील पाणी पातळीवर बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मोठ्या व मध्यम जलायशात मोडल्या जाणाऱ्या मदन उन्नई धरणाची पाणी पातळी अतिशय कमी झाली होती. शिवाय छोट्या जलाशयात मोडल्या जाणाऱ्या वर्धा शहरानजीकच्या रोठा १ व रोठा २ तसेच टाकळी बोरखेडी या जलाशायाची पाणी पातळी ‘बिलो’ होती; पण गुरूवारी रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे याही जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.पोलीस प्रशासनही दक्षगुरूवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुठले-कुठले रस्ते बंद झालेत. शिवाय कुठे अनुचित प्रकार तर घडला नाही ना याची विचारणा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांकडून जिल्हा पोलीस यंत्रणा शुक्रवारी वेळोवेळी करीत होते. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती ओढावल्यास तात्काळ मदत कार्य करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले.नागपूरकरांच्या मदतीसाठी वर्धेची रबर मोटर बोटनागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने सदर तालुक्यातील किरमिटी गाव परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या गावातील नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी त्यांच्याकडे असलेली एक रबर मोटर बोट पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी २.५५ वाजेपर्यंत बोट झटपट कशी पाठविता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू होते.२०२.९३ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात गत २४ तासात एकूण २०२.९३ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात २६.१० मिमी, सेलू तालुक्यात ४४.०० मिमी, देवळी १६.०० मिमी, हिंगणघाट ३०.३२ मिमी, समुद्रपूर ३६.१८ मिमी, आर्वी ३०.५७ मिमी, आष्टी ७.१३ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १२.७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याची सरासरी २५.३७ इतकी असल्याचे सांगण्यात आले.सीमावर्ती भागात ‘अलर्ट’नागपूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे १६० मिमी पाऊस झाल्याचे सांगितले जात असल्याने वर्धा-नागपूर या सीमावर्ती भागातील नदी व मोठ्या नाल्या काढच्या गावांना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाला कुठल्याही पूर परिस्थिशी दोन-दोन हात करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.वायगाव (गोंड)-लाहोरीची वाहतूक ठप्पसमुद्रपूर : सततच्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी वाघाडी नदी दुथडी भरून वाहत होती. वाघाडी नदीच्या पूरामुळे वायगाव (गोंड) - लाहोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय परिसरातील काही शेत जमिनींना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. तालुक्यातील कांढळी तसेच गिरड परिसरातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने या परिसरातील काही भागात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.नंदोरी-हिंगणघाट मार्ग पुरामुळे बंदनंदोरी : गुरूवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने परिसरातील नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून आले. नंदोरी-हिंगणघाट मार्गावरील सावली गावाजवळील नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती.

टॅग्स :Rainपाऊस