शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘त्या’ सबस्टेशनची ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल

By admin | Updated: September 11, 2016 00:43 IST

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा उडाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित केले.

विजयगोपाल : कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा उडाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित केले. या वृत्ताची त्वरित दखल घेत ऊर्जामंत्री मदन येरावार यांनी संबंधित अभियंत्यांना रोहित्र बसविण्याच्या सूचना दिल्या. यामुळे ग्रामस्थांची समस्या निकाली निघणार आहे.येथील सबस्टेशनचा कारभार रामभरोसे सुरू आहे. याबाबतच्या वृत्ताची उर्जा राज्यमंत्र्यांनी लगेच दखल घेत पुलगाव येथील अभियंता व विजयगोपालचे प्रभारी अभियंता यांना दूरध्वनीवर चौकशीचे आदेश दिले. आजच दोन्ही रोहित्र लावावे, असे आदेश दिले. आतापर्यंत का लावले गेले नाही, याची चौकशी करून अहवाल मागविला. शिवाय कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने दोन्ही अभियंत्यांना काय प्रकार चालू आहे, याची चौकशी करून मला त्वरित कळवा. लाईनमनची त्वरित बदली करून तेथे चांगल्या लाईनमनची नियुक्ती करावी, असे आदेश दिले. या आदेशानंतर दोन्ही अभियंत्यांना जाग आली. त्यांनी लगेच दोन रोहित्र आर्वी येथून आणण्यासाठी कर्मचारी रवाना केल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सायंकाळपर्यंत दोन्ही रोहित्र लागतील, असे येथील सबस्टेशनचे प्रभारी अभियंता तिमांडे यांनी सांगितले. उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी दखल घेतल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, ओलित शक्य होणार आहे.(वार्ताहर)सेवाग्राम मार्गावरील जलवाहिनीची दुरूस्तीसेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील जलवाहिनी फुटल्याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित केले. याची नगर परिषदेने दखल घेत ती दुरूस्त केली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सेवाग्राम ते वर्धा मार्गावर महिलाश्रमच्या पूढे पालिकेची जलवाहिनी गेली आहे. हनुमान मंदिराजवळ दोन ठिकाणी तर पेट्रोलपंपाजवळ एका ठिकाणी ती लिक झाली होती. यात मंदिराजवळचा लिकेज मोठा असल्याने डबके साचले होते. जलवाहिनीतून वर्धावासियांना पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुरूस्ती झाली. ती कायमस्वरूपी होणार काय, हा प्रश्नच आहे. याच ठिकाणी नेहमी लिकेज होत असल्याने आरोग्याचा प्रश्न कायम आहे. पालिकेने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)