शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनाअंती बेमुदत उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:40 IST

पुतळा अवमानना प्रकरणी २२ नोव्हेंबर पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय देण्यात येईल असे लिखीत आश्वासनानंतर सहाव्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता झाली.

ठळक मुद्देसहाव्या दिवशी आंदोलनाची घेतली दखल : कारवाईसाठी २२ पर्यंत मागितला वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पुतळा अवमानना प्रकरणी २२ नोव्हेंबर पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय देण्यात येईल असे लिखीत आश्वासनानंतर सहाव्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता झाली. परंतु विविध संघटना व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हिंगणघाट येथे आज पाणी टंचाईच्या बैठकीला आलेल्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे यांना घेराव घातल्यानंतर नाईलाजाने हे पत्र घ्यावे लागल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल काय याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.हिंगणघाट पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा क्षतीग्रसत पुतळा भंगार वस्तूंच्या यादीत टाकून त्याची ४० रुपये किंमत मान्य केली. या प्रकाराने जनमानसात संतप्त भावना निर्माण होऊन विविध संघटनांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी पाच दोषी कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित करून जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे महिन्याभरापूर्वीच अहवाल सादर केला होता. परंतु, कारवाई शुन्य होती. अखेर १२ नोव्हेंबर पासून सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी दोषी कर्मचाºयांवर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. उपोषणाच्या दरम्यानही प्रशासन थंडच होते. अखेर १४ नोव्हेंबरला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहाय्यक अधिकाºयांच्या नावे पत्र काढून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देष दिले. या टोलवाटोलवीने जनभावना अधिकच संतप्त झाली. शनिवारी पाणी टंचाईच्या सभेकरिता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे हिंगणघाट पं.स.मध्ये आले असता त्यांना मराठा संघ, भीम आर्मी सेना, संभाजी ब्रिगेड, विदर्भ राज्य आघाडी, मनसे, रायुकॉ, प्रहार आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यानंतर बैठक घेवून हे लेखी आश्वासन देण्यात आले. वेळीच कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.आत्मदहनाचा इशारालेखी आश्वासन मिळताच बेमुदत उपोषणाची सांगता राजू तिमांडे, अतुल वांदिले, गजू कुबडे, अनिल जवादे, अनिल भोंगाडे, भूषण पिसे, नगरसेवक सौरभ तिमांडे व धनंजय बकाने, सुरेंद्र डोंगरे, उमेश नेवारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. २२ नोव्हेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास २३ नोव्हेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.