शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी मृत्यूच जिंकला, आईच्या अंत्यसंस्काराला नाही जाता आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 20:44 IST

दरम्यान त्या रुग्णालयातील एक परिचारिका करोणा बाधित निघाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

आर्वी ( वर्धा): जीवन व मृत्यू यांच्या २१ दिवसांच्या लपंडावात अखेर मृत्यूने मात केली. गणपती वार्ड आर्वी येथील ७९ वर्षीय सरिजदेवी सुंदरलाल केला यांची ११ जुलैला प्रकृती बिघडली,आर्वी येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अरूण पावडे यांनी पुढील तपासणी व उपचाराकरिता बाहेर नेण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे त्याना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात नेऊन त्यांची अंजिग्राफी करण्यात आली. तीन रक्त वाहिन्यांमध्ये बाधा असल्याने त्यांची १३ जुलैला अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्या रुग्णालयातील एक परिचारिका करोणा बाधित निघाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.अमरावती येथील मुलाकडे असताना त्या पडल्या त्यात त्यांच्या पाठीचे हाड मोडले म्हणून पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात भरती केले,दरम्यान अमरावतीचे खासगी रुग्णालय पुन्हा सुरू झाल्याने त्यांना तिथे हलवून हाड जोडण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले, त्याच दिवशी या रुग्णालयाचा एक चिकित्सक करोना बाधित निघाल्याने तेथून  केला यांना अमरावतीच्या दुस-या खासगी रुग्णालयात हलविले, तत्पूर्वी त्यांची करोणा चाचणी घेण्यात आली होती,तिचा अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना अमरावतीच्या कोविद रुग्णालय असलेल्या दायासागर मध्ये रवानगी झाली,त्या ठिकाणी त्यांच्यावर फक्त कोबिड चाच उपचार सुरू राहिला. दरम्यान त्यांच्या संपर्कात आल्यावर कुटुंबातील ११ व्यक्तीची तपासणी करण्यात आली.घरातील जी मंडळी सावलीसारखे त्यांच्या सोबत होते त्यांची चाचणी नकारात्मक आली, परंतु आर्वी येथून प्रकृती पहायला गेलेल्या संदीप नामक लहान मुलाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने त्यालाही दयासागर मध्ये भरती ठेवण्यात आले.त्याचा उपचार कालावधी संपल्यानतर तो आर्वीला आला व स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या आदेशा प्रमाणे तो गृहविलिगिकरणात आहे.त्याच्या आईला आज सुट्टी मिळणार होती,परंतु त्यांचा दुसरा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने व  त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू ठेवले दरम्यान १ऑगस्ट ला सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.हे वृत्त आर्वी येथे गृहविलगीकर्णात असलेल्या संदीपला कळताच त्यास ते दुःख असह्य.झाले.तो ५० किलोमीटर अंतरावरील अमरावतीला जिल्हा बंदीमुळे जाऊ शकला नाही व व्हिडिओ वर आईचा अंत्यसंस्कार पाहत राहिला,हे पाहून उपस्थितांचे ही डोळे भरून आले.