शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित नागरिकांना घरकुलासाठी मिळणार पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

देवळी नगरपरिषद अंतर्गत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत होते, आज त्यांना हक्काची जागा प्राप्त झाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम करण्यास मोकळे झाले आहे, तसेच देवळी अंतर्गत अनेक नागरिकांचे अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत आहे, त्या सर्व उर्वरीत नागरिकांना सुध्दा टप्याटप्याने जमीनीचे पट्टे मिळणार, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देघरकुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप : खासदारांसह नगराध्यक्षांची उपस्थिती, घरकुल लाभार्थ्यांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : प्रत्येक माणसाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही, त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. देवळी नगरपरिषद अंतर्गत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत होते, आज त्यांना हक्काची जागा प्राप्त झाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम करण्यास मोकळे झाले आहे, तसेच देवळी अंतर्गत अनेक नागरिकांचे अतिक्रमन नियमाकुल करणे प्रलंबीत आहे, त्या सर्व उर्वरीत नागरिकांना सुध्दा टप्याटप्याने जमीनीचे पट्टे मिळणार, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.येथील नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना जागेचे पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देवळी नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक १६ व १७, इंदिरानगर मधील शेत सर्वे क्रमांक ७०७,७०९,९६१ कुरण, ७०६ शासकीय, ७०८ कमिटी देवळी म्युनिसिपल, वॉर्ड क्रमांक ७ फुकटनगर शेत सर्वे क्रमांक ९७८ पहाड व खडक, वार्ड क्रमांक २ आणि ४ आठवडी बजार मागील परिसर ते महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत शेत सर्वे क्रमांक ६०४ पहाड व खडक, ६१३ व ६१२ कमिटी देवळी म्युनिसिपल, ६११ व ६०३ आबादी, वॉर्ड क्रमांक ३ काळापूल ते दिघी नाका परिसर शेत सर्वे क्रमांक ६२१, ६८७, ६६८ व ६२२ कुरण, वॉर्ड क्रमांक १३ व १४ यवतमाळ रोड शासकीय, शेत सर्वे क्रमांक २ शासकीय व वॉर्ड क्रमांक १० काळापूल ते सृजन कॉन्व्हेंटकडे जाणारा रस्ता येथील रस्ता व नाल्याच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यात आलेल्यांना जमिनीच्या पट्ट्याचे वाटप खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, सभापती नंदकिशोर वैद्य, गटनेत्या शोभा तडस, सदस्य सारिका लाकडे उपस्थित होत्या.घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पट्टे वाटपवर्धा: प्रधानमंत्री आवास व रमाई योजनेतील लाभार्थ्यांना ते राहत असलेल्या जमिनीच्या पट्ट्याचे वाटप पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रणजीत कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे व मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची उपस्थिती होती. प्रधानमंत्री आवास योजनेतील १६८ व रमाई योजनेतील २८ लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम या पट्टयासाठी थांबले होते. घरकुलासाठी निधी उपलब्ध असतानाही पट्ट्याअभावी निधी देता येत नव्हता. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम अडचणीत आले होते. खासदार रामदास तडस यांनी सुद्धा पट्टे मिळावे यासाठी प्रयत्न केले. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा व्यक्तिगत आर्थिक सहभाग म्हणून देवळी नगर परिषदेने साडेसात लाखाचा भरणा करुन या प्रकणाला गती दिली.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस