शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कर्मचारी रजेवर, ‘झेडपी’त शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:54 IST

सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेले काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहताही सुट्यांंच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, याचा प्रत्यय सोमवारी जिल्हा परिषदेतील परिस्थितीवरून आला. येथील १८ विभागांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने कामांचा चांगलाच खोळंबा झालेला होता.

ठळक मुद्देसुट्यांचे केले सोने : अठराही विभागातील खुर्च्या रिकाम्याच, अनेकांना करावा लागला गैरसोईचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेले काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहताही सुट्यांंच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, याचा प्रत्यय सोमवारी जिल्हा परिषदेतील परिस्थितीवरून आला. येथील १८ विभागांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याने कामांचा चांगलाच खोळंबा झालेला होता. अनेकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागले.जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री मानली जाते. मागील दोन ते तीन वर्षांपासून अधिकारी व कर्मचाºयांवर पदाधिकाºयांचा वचक राहिला नसल्याने ‘पदाधिकारी कमजोर तर अधिकारी शिरजोर’ असेच चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, बालक ल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वित्त विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, निरंतर शिक्षण विभाग, सर्वशिक्षा अभियान, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी १८ विभाग आहेत. यातील सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग अधिकाºयांच्या प्रवृत्तीसह इतर कारणांमुळे सदैव चर्चेत असतो. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने जिल्हा परिषद इमारतीत फेरफटका मारला असता अठराही विभागातील अर्धेअधिक अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. कार्यालयात उपस्थित असलेले बोटावर मोजण्याइतके अधिकारी व कर्मचारी आपल्याच विश्वात मग्न होते. काही गप्पांमध्ये तर काही मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसून आले. अनेक विभागात कुणी नसताना पंखे सुरूच हेते. रित्या खुर्च्यांना ते हवा देत होते. यात विजेची उधळपट्टी होताना दिसली. अधिकारी व कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मात्र आल्यापावलीच परत जावे लागले.लाँग विकेंडचा एन्जॉयजिल्हा परिषदच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा करतात. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार उशीरा येणे आणि लवकर परत जाणे, हा प्रकार नित्याचाच झाला आहे. असे असतानाही सुट्या आल्या की त्याचे सोनं करण्याची संधी अधिकारी, कर्मचारी सोडत नाहीत. नुकताच चौथा शनिवार आल्याने शनिवारी सुटी होती. तसेच दुसऱ्या दिवशी रविवार आणि पुन्हा मंगळवारी नाताळाची सटी आल्याने बहुतांश अधिकाऱ्यांनी सोमवारचीही सुटी घेऊन लाँग विकेंडचा एन्जॉय केला. याविषयी माहिती जाणून घेतली असता काहींनी अर्ज न देताच दांडी मारल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यावर आता वरिष्ठांकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.खरे काय, नि खोटे काय?जिल्हा परिषदेतील अठराही विभागाला भेट दिली असता कार्यालयातील बहुतांश खुर्च्या रित्याच होत्या. तर उपस्थित कर्मचारी गप्पांमध्ये रंगलेले दिसून आले. त्यांना वरिष्ठांबाबत विचारले असता कुणी दौऱ्यावर, तर कुणी न्यायालयात गेल्याचे सांगितले. परंतु, याची शहानिशा करण्यासाठी काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी मी रजेवर असल्याची क बुली दिली. त्यामुळे यात खरे काय नि खोटे काय, हे चौकशीअंतीच कळेल. त्यामुळे रजेवर असेल तर त्यांचा अर्ज होता का? किती अधिकारी व कर्मचाºयांनी रितसर अर्ज सादर करून रजा घेतली, हेही तपासण्याची वेळ आली आहे.माध्यमिक शिक्षण व कृषी विभाग वाऱ्यावरमाध्यमिक शिक्षण विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आजही या कार्यालयात कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांपैकी केवळ तीनच कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. उर्वरित रजेवर असल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी इतक्या कर्मचाऱ्यांना रजेवर जाता येते काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कृषी विभागातही अशीच परिस्थिती दिसून आली. येथील तांत्रिक विभागातील संपूर्ण खुर्च्या खाली होत्या, तर कृषी विभागात चार-पाच महिला कर्मचारी उपस्थित होत्या. त्यामुळे हे दोन्ही विभाग आज वाºयावरच असल्याचे दिसून आले.कर्मचाºयांच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार संबंधित विभाग प्रमुखांकडे आहे. सध्या सलग सुट्या आल्यामुळे अधिकारी व कर्मचारी रजेवर गेले असावे, याबाबत माहिती घ्यावी लागेल.-अजय गुल्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी. जि.प. वर्धा.