शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

चूक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याची; फटका विद्यार्थ्याला

By admin | Updated: June 25, 2017 00:32 IST

आरोग्य विभागाने जन्माची नोंद घेताना केलेली गफलत विद्यार्थ्याच्या अंगलट आली आहे. पुरूष असताना नोंद स्त्री-लिंग अशी करण्यात आली.

जन्म तारखेतही घोळ : पुरूष ऐवजी केले स्त्री लोकमत न्यूज नेटवर्क आकोली : आरोग्य विभागाने जन्माची नोंद घेताना केलेली गफलत विद्यार्थ्याच्या अंगलट आली आहे. पुरूष असताना नोंद स्त्री-लिंग अशी करण्यात आली. शिवाय ग्रा.पं. जन्म-मृत्यू नोट रजिस्टर व शाळा दाखल -खारीज रजिस्टरच्या जन्म नोंदीत तफावत आहे. यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास अडचण झाल्याने त्याची फरफट होत आहे. भटक्या-विमुक्त जमातीतील गोसावी समाजाचे मुलचंद धांदू हे निरक्षर असले तरी आपल्या मुलाने शिकावे, अशी त्यांची इच्छा आहे. मुलगा राज हा यंदा दहावी उत्तीर्ण झाला. यामुळे जात प्रमाणपत्राकरिता त्याने तहसील कार्यालयात अर्ज केला होता; पण अर्जासोबत जन्माची मूळ नोंद असलेला पुरावा न जोडल्याने प्रकरण परत आले. ग्रा.पं. कार्यालयात त्याने जन्माचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला. तेव्हा नोंदी तपासत असताना त्याच्या नावापुढे स्त्री-लिंग, अशी नोंद असल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. हे ऐकताच विद्यार्थ्याच्या डोळयापुढे काजवे चमकू लागले. या चुका येथेच थांबल्या नाही तर जन्म तारखेतही घोळ झाल्याचे दिसून आले. शाळा दाखल रजिस्टरनुसार त्याचा जन्म २१ सप्टेंबर २००० तर ग्रा.पं. रेकॉर्ड नुसार ११ आॅक्टोबर २०१० आहे. ही घोडचुक आरोग्य उपकेंद्राची असो वा ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची; पण मनस्ताप त्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला होत आहे. यावर उपाय मात्र कुणीच सांगत नसल्याने त्याची फरफट होत आहे. शिक्षण व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झालेली घोडचुक कशी दुरूस्त करता येईल, या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.