शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे ९०० वर कर्मचारी संपावर

By admin | Updated: July 16, 2014 00:21 IST

नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलने केलीत; पण कुठलाही तोडगा निघाला नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे़ पहिल्याच दिवशी

कामे ठप्प : अधिकाऱ्यांना निवेदन सादरवर्धा : नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलने केलीत; पण कुठलाही तोडगा निघाला नाही़ यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे़ पहिल्याच दिवशी संपामध्ये जिल्ह्यातील सुमारे ९१० च्या वर कर्मचारी सहभागी झाले़ यामुळे जिल्ह्यातील सहाही नगर परिषदांतील कामे थांबली होती़महाराष्ट्र ऩप़ कर्मचाऱ्यांतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मंगळवारपासून पुकारण्यात आला़ या संपात जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी (रेल्वे) या सहाही नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले आहे़ पाणीपुरवठा वगळता संप सुरू झालेला आहे. मागण्या मंजूर न झाल्यास शुक्रवारपासून पाणीपुरवठाही बंद करण्यात येणार असल्याचे ऩप़ कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष महेश दुबे यांनी सांगितले़ वर्धा नगर परिषदेमधील सुमारे ३२० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत़ दोनवेळा न्याय्य मागण्यांबाबत पूर्ण न झाल्याने तिसऱ्यांदा पालिकेचे १३६ सफाई व इतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत़ दुपारी १ वाजता नगर परिषद ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांबाबत उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऩप़ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय अंभोरे, उपाध्यक्ष अरुण पंड्या, सचिव देवेंद्र गोडबोले, किशोर नेवारे, चांदमल कश्यप, महेंद्र शिंगाणे, वैशाली बुटले, कृष्णा मडावी, महेंद्र कुरळकर, अजीत घडवे, मोहन थिगळे व सफाई कर्मचारी उपस्थित होते़ ऐन पावसाळ्यात कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरातील स्वच्छता व अन्य कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.देवळी नगर परिषद कर्मचारी संघ राज्य न.प. कर्मचारी संघटनेच्या सलग्न असून संपात देवळी पालिकेचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी वगळता सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती न.प. कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष नितीन सायंकर यांनी दिली़ संपात नगराळे, चिंचपाले, गजभिये, खोडे, डफरे, येनुरकर, धोबे, शेंडे बोरसरे, ताकसांडे, आनंद झाडे यांच्यासह सफाई कर्मचारी जीवन शेंडे, लता बेसरे व अन्य कर्मचारी सहभागी आहेत़हिंगणघाट येथील विविध विभागातील ३०० कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत़ संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खूपसरे, सुरेश आडेपवार, संजय मानकर, विश्वनाथ माळवे, मिलिंद पिंपळखूटे, प्रकाश लंके, प्रभाकर कन्नाके, मुरडीव, दिलीप झोरे, प्रवीण काळे, दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले़ पुलगाव नगर पालिकेतील १२३ कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या दिवशी ५८ कर्मचारी सहभागी झालेत़ यावेळी कर्मचाऱ्यांनी ऩप़ मुख्याधिकारी भगत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले़ सिंदी (रेल्वे) नगर परिषदेतील ५० कर्मचारीही संपामध्ये सहभागी झाले आहेत़ सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामे ठप्प झालीत़ शिवाय शहरांतील स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)