शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

अवैध व्यवसायांविरुद्ध येळाकेळी ग्रामपंचायतीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 5:00 AM

येळाकेळी गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. दारूविक्रीसह मटका व अन्य अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी मंदिरांनादेखील सोडले नाही. मंदिर परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी मंदिर परिसरात ठाण मांडून असतात. दारूची झिंग चढली की, अश्लील शिवीगाळ करतात. याबाबत सावंगी पोलिसांना रितसर लेखी तक्रार करण्यात आली.

ठळक मुद्देआमदारांंच्या नेतृत्वात अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील येळाकेळी गावात अवैध व्यवसायांचा बोलबाला असून, यावर पायबंद घालणे कठीण झाले आहे. आक्षेप घेतला, तर ठार मारण्याची धमकी दिली जाते. या सर्व अवैध व्यावसायिकांना सावंगी पोलिसांचे पाठबळ आहे. त्यामुळे गावातील दारूविक्रीसह अन्य अवैध व्यवसायांवर पायबंद घालावा, अशी मागणी येकाळेकी ग्रामपंचायत सदस्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात सर्व सदस्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांना निवेदन दिले.येळाकेळी गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. दारूविक्रीसह मटका व अन्य अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी मंदिरांनादेखील सोडले नाही. मंदिर परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी मंदिर परिसरात ठाण मांडून असतात. दारूची झिंग चढली की, अश्लील शिवीगाळ करतात. याबाबत सावंगी पोलिसांना रितसर लेखी तक्रार करण्यात आली. परंतु पोलिसांनी कोणत्याहीप्रकारची कार्यवाही केली नाही. पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. ग्रामपंचायत सदस्यांकडे नागरिक या त्रासाची कैफीयत मांडत असल्याने आम्ही अनेकदा अवैध व्यावसायिकांना समज देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात येते. दारूविक्री व मटका व्यवसायाला आळा घालण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. तरी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आता कारवाईकडे गावकऱ्यांचे  लक्ष

nसरपंच वंदना चलाख, उपसरपंच रूपेश पिंपळे, भाऊराव कोहळे, प्रियदर्शनी ठाकरे, वंदना चलाख, ममता घोंगडे, विमल कंडे, राहुल येलारे, उषा उडाण, हितेश भांडेकर, अशोक येलारे, शीतल गडकर, वसंत करनाके, भाजपचे सेलू तालुकाअध्यक्ष अशोक कलोडे यांनी गावात अवैध व्यवसायांत गुंतलेल्या व्यावसायिकांची यादीदेखील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांना दिली असून, आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पोलीस चौकीची केली मागणीnयेळाकेळी गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. गावालगत अन्य खेडीसुद्धा आहेत. मात्र गावात अवैध व्यवसाय व अन्य असामाजिक घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीgram panchayatग्राम पंचायत