शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वैदर्भीय बेरोजगार युवकांचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:51 IST

हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड्यात केली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडी : आंदोलनातून बेरोजगारांना नोकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड्यात केली. यात ७२ हजार नोकऱ्या विदर्भातील बेरोजगार युवकांना मिळाव्या याकरिता उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.गत अनेक वर्षांपासून विदर्भातील तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये अनेंकदा शासकीय नोकरभरती झाली; परंतु विदर्भातील बेरोजगार तरुणांना मात्र न्याय मिळाला नाही. नागपूर करारानुसार शासकीय नोकरीमध्ये सुद्धा विदर्भातील तरुणांना २३ टक्के वाटा मिळायला पाहिजे होता. तो मिळाला नाही. म्हणून १९६० पासून विदर्भामध्ये नोकरीच्या संदर्भात ४ लाख एवढा अनुशेष निर्माण झालेला आहे. गत अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने नोकरभरती केलेली नाही. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार शासकीय पदे भरण्याचे जाहीर केले. ३६ हजार नोकऱ्या सन २०१८ मध्ये व ३६ हजार नोकऱ्या २०१९ मध्ये जाहीर केले आहे. विदर्भाचा अनुशेष लक्षात घेता ७२ हजार पदे विदर्भातील बेरोजगारांकरिता राखीव ठेवावे. यामुळे विदर्भाचा अनुशेष कमी होईल. यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेवून विदर्भातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विदर्भ राज्य उपाध्यक्ष अनिल जवादे यांनी केले. या मोर्चामध्ये शहर अध्यक्ष शकील अहमद, संयोजक महेश माकडे, विधानसभा अध्यक्ष बंटी रघाटाटे, तालुका अध्यक्ष जयंत धोटे, युवा तालुका अध्यक्ष अश्विन तावाडे, महिला अध्यक्ष सुनिता भितघरे, युवा शहर अध्यक्ष अजय मुळे, महासचिव विक्की भितघरे, भारत पाटील, रहेमत खॉ पठाण, प्रवीण हटवार, रामू सोगे, सुरज शेंडे, सुमीत हिंगे, हेमा दुरबुडे, सुरत नौकरकर, निखिल तडस, निखिल डेकाटे, सुरज टिपले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ