शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अकरा जलाशयातील पाणीसाठा तळालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:20 IST

यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे.

ठळक मुद्दे७७ टक्के पावसाची नोंद : प्रकल्पात ४१.३६ टक्केच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. सध्या सर्व जलाशयामध्ये केवळ ४१.३६ टक्के च पाणी उपलब्ध असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा व देवळी या आठही तालुक्यात पावसाने यावर्षी दडी मारली. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात दमदार पाऊस झाला नसल्याने नद्या व जलाशय अद्यापही तहाणलेलच आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यावर या एकाच पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला होता. या एकाच पावसामुळे जलाशयाच्या पातळीत थोडी का होईना; पण वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये ७७ टक्के च पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अल्प पावसामुळे वर्धा नगरपालिकेसह इतरही ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे.अजून हिवाळाही उलटायचा असतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती चिंतनीय आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आतापासूनच पाणी बचतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शहरात पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.रब्बी हंगामही धोक्यातजिल्ह्यातील अकरा जलाशयातून पिण्याकरिता, शेतीकरिता व उद्योगाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. सध्या जलाशयात ४१.३६ टक्के जलासाठा उपलब्ध आहे. यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. त्यानंतर सिंचन आणि नंतर उद्योगाला पाणी देणे अपेक्षीत आहे. परंतु सिंचनाला पाणी देण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविल्याने यावर्षीचा रब्बी हंगामही अडचणी आला आहे. खरिपातही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागता तर आताही पाण्याअभावी रब्बीतही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई