शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात अकरा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:43 IST

दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात अकरा जण जखमी झालेत. यातील सात जण गंभीर असून त्यांच्यावर नागपूर, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही अपघात रविवारी कारंजा, सावंगी (मेघे) शिवारात घडले.

ठळक मुद्देकारंजा व वर्धेतील अपघात : ट्रक झाडाला अडकल्याने वाचले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/कारंजा (घा.) : दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात अकरा जण जखमी झालेत. यातील सात जण गंभीर असून त्यांच्यावर नागपूर, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही अपघात रविवारी कारंजा, सावंगी (मेघे) शिवारात घडले.ट्रक क्र. टीएन २८ एई ६६८८ हा बोरींग मशीनसह सोलापूर येथून पांढूर्णा (म.प्र.) येथे भारसिंगी मार्गे जात होता. ट्रकमध्ये बोरींगचे रॉड होते. कारंजा येथून आठ किमी अंतरावर तरोडा चक्रीघाटात बोरींग मशीनचा हा ट्रक रविवारी सकाळी ८ वाजता पलटी झाला. यात ८ मजूर जखमी झाले असून ४ मजूर गंभीर आहेत. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. बोरींग मशीन गाडीवर १५ मजूर होते. गाडी पलटी झाली त्यावेळी एका झाडाला अडल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा खाली ४० ते ५० फुट खोल दरी होती. मजूर ओडीसा येथील असून रूखधर घोर (३२), शोभा लकी (१९), तुळशीराम जाणी (२५), टिनात लकी जाणी (१८), रघु उज्जरे (१९), लक्ष्मीपुत्र बिरासदार (२७), दन्शंल चंदर (२०), देवसिंग माधव (४०) अशी जखमींची नावे आहे.मालवाहू ट्रकवर आदळला, तिघे जखमीवर्धा - भरधाव मालवाहूचा टायर अचानक पंक्चर झाला. यामुळे अनियंत्रित मालवाहू समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळला. हा अपघात रविवारी सकाळी वर्धा-देवळी मार्गावरील सावंगी शिवारातील राजीवनगर परिसरात झाला. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.वर्धेकडून देवळीकडे एमएच ३२ क्यू ३२४४ क्रमांकाचा मालवाहू भाजीपाला घेऊन जात होता. भरधाव मालवाहूचा सावंगी शिवारात अचानक टायर पंक्चर झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मालवाहु देवळीकडून वर्धेकडे येणाºया एमएच ४०/७७१७ क्रमांकाच्या ट्रकवर धडकला. दरम्यान, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या कडेला झाडावर धडकला. या अपघातात मालवाहूचा चालक व त्यातील एक व्यक्ती तसेच ट्रकचालक, असे तिघे जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. सावंगी ठाण्याचे पंढरी मोहदूरे व समीर फटींग यांनी पंचनामा केला. या घटनेची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली असून वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही.

टॅग्स :AccidentअपघातKaranjaकारंजा