शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात अकराशे रुपये क्विंटलची केळी सहाशे रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:53 IST

कोरोनामुळे केळी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, मागणी घटली.

ठळक मुद्दे केळी उत्पादकांना मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये केळीला प्रतिक्विंटल अकराशे रुपये भाव होता. आता त्याच केळीला प्रतिक्विंटल सहाशे रुपयांचा भाव मिळत असल्याने केळी उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.कोरोनामुळे केळी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, मागणी घटली. शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की तो कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्या काळात तोडणी झालेल्या केळीला बाजारात भाव मिळाला नाही. ज्या व्यापाऱ्यांनी हा माल खरेदी करून, पिकविण्याची प्रक्रिया करून बाजारात नेला. मात्र, उठाव नसल्याने केळीचे भाव पडले. अडचणींच्या काळात शेती हंगामावर केळीपासून रोख पैसा मिळतो. त्यावर संपूर्ण शेतीचा खर्च चालतो. मात्र, यंदा एकाएकी भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. सेलू तालुक्यात सिंचन व्यवस्थेमुळे कमी झालेल्या केळीच्या बागा वाढत असताना अशा भावबाजीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता बदलत चालली आहे. तालुक्यात यंदा सोयाबीन व तुरीचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणाऱ्या केळीच्या भावातील कोरोनामुळे झालेली घट शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची ठरली आहे.

आम्ही कॅशक्रॉप म्हणून केळीच्या बागा लावतो. खूप मेहनत घेतो. यंदा कोरोनामुळे केळीची भाव पडले. जानेवारी, फेब्रुवारीत अकराशे बाराशे रुपये क्विंटलची केळी एकदम सहाशे रुपयांवर आली. सरकारने आमचाही विचार करायला हवा.- कवडू लटारे, केळी उत्पादक, शिवनगाव, ता. सेलू.

टॅग्स :fruitsफळे