शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:30 IST

गांधी जयंतीच्या दिवशी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली सभा मंगळवारी झाली. येथेही पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गोंधळ झाल्याने सदर सभा गुरुवारी पार पडली.

ठळक मुद्देसभेत ग्रामस्थांची विक्रमी उपस्थिती : विजयाची माळ घंगारेच्या गळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गांधी जयंतीच्या दिवशी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली सभा मंगळवारी झाली. येथेही पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गोंधळ झाल्याने सदर सभा गुरुवारी पार पडली. बाजार चौकात जि.प. सदस्य विनोद लाखे यांच्या अध्यक्षतेखाली तणावाच्या वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून गोविंदा घंगारे याची निवड झाली. यावेळी २४ लोकांची समिती गठित करण्यात आली.चार तास चाललेल्या या निवड प्रक्रियेत ३९८ ग्रामस्थांनी मतदान केले. सकाळी सभेला सुरुवात झाल्यानंतर पाणीपुरवठा समितीतील सदस्यांची जनतेतून निवड झाली. यात २२ सदस्य एक अध्यक्ष व ग्राम विकास अधिकारी पदसिद्ध सचिव अशा २४ जणांची निवड झाली.सभेत अध्यक्ष पदाकरिता ११ नावे आली होती. त्यापैकी आठ जणांनी आपली नावे मागे घेतली. तर राहिलेल्या तिघांतील गोविंदा घंगारे, आनंद खोब्रागडे व क्रिष्णा वाकडे यांच्यात निवडणूक झाली. यात गोविंदा घंगारे विजयी झाले. त्यांना २४० मते मिळाली. खोब्रागडे यांना ३८ व क्रिष्णा वाकडे यांना ११० मते मिळाली. मतमोजणीनंतर क्रिष्णा वाकडे व आनंद खोब्रागडे यांनी बोगस मतदान झाल्याचा आक्षेप घेत फेर मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु उपस्थित ग्राम विकास अधिकारी ढोक, भंते सदानंद महास्थविर, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फाऊख शेख, युसूफ शेख, विनोद लाखे यांनी त्यांची समजूत घातली व घंगारे यांना विजयी घोषित केले.सरपंच रेखा शेंदरे यांच्यावर मतदानाच्यावेळी मते बिघडविण्याच्या आरोप करीत हमीदा शेख यांनी सरपंच व उपसरपंच यांच्याशी वाद घातल्याने काही काळ तणावाची स्थिती होती.