शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 18:44 IST

Wardha News  विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

वर्धाः  विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्ध्यामध्ये ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन वर्ध्यातील स्वावलंबी शाळेच्या पटांगणावर ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीकरिता मंगळवारी अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या सभागृहात अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला १९ पैकी १८ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून अध्यक्षपदाकरिता आलेल्या आठ नावांवर चर्चा करण्यात आली. यातून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत संमेलनादरम्यान होणार असलेल्या कार्यक्रमांची रूपरेषाही ठरविण्यात आली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा करून होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली.

पत्रकार परिषदेला महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाहक डॉ. उज्ज्वल मेहेंदळे, कोषाध्यक्ष पराग पागे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, प्रकाश होळकर, मनोहर सप्रे, दादा गोरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. किरण सगर, ए. के. आकरे, प्रकाश गर्गे, प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे, डॉ. भारत सासने, संजय इंगळे तिगावकर, डॉ. राजेंद्र मुंडे, रंजना दाते, महेश मोकलकर, डॉ. स्मिता वानखेडे, बावीसकर, शेख हाशम, आकाश दाते, विकास लिमये, उदय पाटणकर, विवेक अलोणी, प्रदीप मुन्शी, इंद्रजीत ओरके, प्रदीप मोहिते, अनिल गडेकर व प्रमोद कळमकर यांची उपस्थिती होती.

मावळते अध्यक्ष करणार ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शनाकरिता ३०० गाळ्यांची निर्मिती केली जाणार असून, प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि यांच्या सोईकरिता संमेलनाच्या आदल्या दिवशी २ फेब्रुवारीला मावळत्या अध्यक्षांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, १०. ३० वाजता महामंडळाच्या ध्वजवंदनाने संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कविसंमेलन, कवी कट्टा असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :literatureसाहित्य