शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवर निवडणूक विभागाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:25 IST

लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचेच कापडी फलक, झेंडे आदी बाबींसाठी आयोगाकडून नियम लागू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचेच कापडी फलक, झेंडे आदी बाबींसाठी आयोगाकडून नियम लागू करण्यात आले आहेत. प्रचाराच्या वाहनांवरही निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे.लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली असताना शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पक्षाच्या नावाने नंबर प्लेट, मजकूर, जाहिराती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रादेशिक परिवहन विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी, निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाºया वाहनांवर निवडणूक विभागाकडून कडक नियम लागू करणे आवश्यक आहे. त्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनांच्या डाव्या बाजूला विंडो स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही. आणि तो त्या वाहनाच्या टपापासून दोन फूट उंचीपेक्षा अधिक राहणार नाही.प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाच्या पक्ष प्रचाराच्या झेंडा किंवा कापडी फलकासंबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार, प्रतिनिधी यांच्या वाहनां व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही, असे आदेश निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत. मतमोजणी होईस्तोवर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.पक्षाच्या नंबर प्लेट लावून वाहन पळविणाऱ्यांना चापलोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असताना शहरातून धावणाºया काही दुचाकी व चारचाकी वाहनांवर पक्षांच्या नावाने नंबर प्लेट मजकूर, जाहिराती प्रसारित होत असल्याचे दिसून येते. अशा वाहनांवर आचारसंहिता कलमान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याने पक्षाच्या नंबर प्लेट लावून वाहने पळविणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच ध्वनीक्षेपक लावलेल्या वाहनाला धावत्या वाहनातून प्रचार करता येणार नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक