गिरड : शेतात काम करीत असताना इसमावर एकाएकी मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध शेतकरी भाऊराव मारोतराव डहाके (६६) रा. गिरड हे जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिरड शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊराव डहाके हे शेतात काम करीत होते. डबा खाण्यासाठी त्यांनी झाडाखाली विसावा घेतला. याचवेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. हा प्रकार पाहुन शेत मजुराने घटनास्थळावरून पळ काढला. भाऊरावनेही स्वत:चा बचाव करण्यासाठी ज्वारीच्या शेतात आडोसा घेण्याचा प्रयत्न केला. माशा त्यांच्या शरीरावर घोंगावल्याने त्यांचा काही वेळात मृत्यू झाला. घटनेची माहिती गिरड पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (वार्ताहर)
मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध ठार
By admin | Updated: March 13, 2015 02:02 IST