शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

मारोतराव भुजाडे (७५) रा. पुलफैल, वर्धा असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते पुलफैल परिसरातील पुलाखाली पडून होते. त्याच परिसरात राहणारे नासिर खान अकबर खान पठाण यांना ते ओळखीचे दिसल्याने त्यांनी लगेच ऑटो बोलावून बुधवारी दुपारी २ वाजतादरम्यान त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. याची माहिती भुजाडे यांच्या परिवारालाही दिली. नातेवाईकही लागलीच रुग्णालयात आले.

ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  येथील सामान्य रुग्णालयात उपरार्थ दाखल करण्यात आलेल्या वृद्धावर थातुरमातूर उपचार करुन घरी परतवून लावले. रुग्णास दाखल करुन घेण्याची विनंती केल्यानंतरही कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानी घरचा रस्ता दाखविला. घरी पोहोचताच वृद्धाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालय गाठून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. मारोतराव भुजाडे (७५) रा. पुलफैल, वर्धा असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते पुलफैल परिसरातील पुलाखाली पडून होते. त्याच परिसरात राहणारे नासिर खान अकबर खान पठाण यांना ते ओळखीचे दिसल्याने त्यांनी लगेच ऑटो बोलावून बुधवारी दुपारी २ वाजतादरम्यान त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. याची माहिती भुजाडे यांच्या परिवारालाही दिली. नातेवाईकही लागलीच रुग्णालयात आले. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी गोडे कार्यरत होत्या. त्यांनी रुग्णाची पूर्ण तपासणी न करता हाताच्या बोटाला तात्पुरती पट्टी बांधून तीन इंजेक्शन दिले. त्यानंतर लगेच घरी घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णाची प्रकृती पाहून दाखल करुन घेण्याची विनंती केली; पण रुग्णासह नातेवाईकांना बाहेरचा मार्ग दाखविला. त्यामुळे नाईलाजाने ते वृद्ध रुग्णाला घरी घेऊन गेले. काही वेळातच वृद्धाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मृतासह रुग्णालय गाठून वैद्यकीय अधिकारी डॉ. गोडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.रुग्णालयात आल्यावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांनी डॉ. गोडे यांना बोलाविण्याची मागणी लावून धरली. यादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अनिल वानखेडे यांनी येऊन मृताची पाहणी केली. तसेच शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालांती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यासंदर्भात मृताचे नातेवाईक ज्योती प्रकाश मस्के, दिव्या प्रकाश मस्के यांनी पोलिसातही तक्रार दिली आहे.   

वृद्धाचा रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक ते उपचार त्यांच्यावर केलेत. यात नातेवाईकांचा काही तरी गैरसमज झाला असून शवविच्छेदनानंतर सर्व स्पष्ट होईल.- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर