लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराचे हृदयस्थान असलेल्या रामनगर भगतसिंग चौक परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या रुग्णावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या निकट संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील १४ दिवसांकरिता क्वारंटाईन रहावे लागणार असल्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.रामनगर भगतसिंग चौक भागातील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींसह सदर व्यक्ती ज्या खासगी डॉक्टराकडे उपचारासाठी गेला होता त्या डॉक्टर दाम्पत्यासह एका औषधी विक्रेत्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हे आठही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.निकट संपर्कात आलेल्या व्यक्तीचा कोविड अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांकडून सूचना प्राप्त होताच या व्यक्तींना घरी जाण्याची मूभा दिली जाणार असली तरी कमीत कमी पुढील १४ दिवस या व्यक्तींना समाजात मिसळता येणार नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी बोरकर यांनी सांगितले.रामनगर येथील कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनासह रामनगरवासियांना दिलासा मिळाला आहे.कन्टेन्मेंट झोनमधील कुठल्याही व्यक्तीस कोरोनाची लक्षणे नाहीरामनगर भगतसिंग चौक परिसरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर या भागातील १६८ घरांची लोकवस्ती क्लस्टर कृती आराखडा योजना लागू करून सील करण्यात आले आहे. याच परिसरातील एकूण ६५४ व्यक्तींपैकी कुण्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास आले काय याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या चमूकडून करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान कन्टेन्मेंट झोन मधील कुठल्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची ही प्राथमिक लक्षणे नसल्याचे पुढे आले आहे.नोडल अधिकारी करणार घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठावर्धा शहरातील रामनगर भगतसिंग पुतळा भाग कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे. या परिसरात विनापरवानगी कुण्या व्यक्तीला जाण्यासह तेथून कुणाला बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कन्टेन्मेंट झोन मधील कुण्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू लागल्यास त्याचा पुरवठा तेथे नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत केला जाणार आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आठ व्यक्ती निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST
रामनगर भगतसिंग चौक भागातील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींसह सदर व्यक्ती ज्या खासगी डॉक्टराकडे उपचारासाठी गेला होता त्या डॉक्टर दाम्पत्यासह एका औषधी विक्रेत्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हे आठही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आठ व्यक्ती निगेटिव्ह
ठळक मुद्देरामनगरवासियांना दिलासा : खबरदारीचा उपाय म्हणूून १४ दिवस रहावे लागेल क्वारंटाईन