शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी आठ हौद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:41 IST

संभाव्य जलप्रदुषणाला आळा घालता यावा तसेच गणेश भक्तांना सुविधा मिळावी या उद्देशाने गत वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वर्धा न.प. प्रशासनाने यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी कंबर कसली आहे. न.प.च्यावतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत शहरातील विविध आठ ठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देन.प.ने कसली कंबर : जल प्रदूषण रोखण्यासाठी होणार प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संभाव्य जलप्रदुषणाला आळा घालता यावा तसेच गणेश भक्तांना सुविधा मिळावी या उद्देशाने गत वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वर्धा न.प. प्रशासनाने यंदाच्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी कंबर कसली आहे. न.प.च्यावतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत शहरातील विविध आठ ठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्यात येणार आहेत.गणेश मुर्ती विसर्जन दरम्यान होणाऱ्या जलप्रदुषणाला आळा घालण्यासाठी सुमारे मागील तीन वर्षांपासून वर्धा न.प.च्यावतीने पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जन उपक्रम हाती घेवून ठिकठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्यात येत आहे. गत वर्षी न.प.च्या या उपक्रमाला वर्धेकरांची चांगला प्रतिसाद दिला होता. त्याच पाश्वभूमिवर यंदाही वर्धा न. प. प्रशासनाने आठ ठिकाणी कृत्रिम हौद ठेवण्याचे निश्चित केले आहे. या आठही ठिकाणी निर्माल्यही गोळा केले जाणार आहे. गोळा करण्यात आलेल्याची योग्य विल्हेवाट न.प. प्रशासन लावणार आहे. प्रत्येक कृत्रिम हौदाच्या ठिकाणी एक अधिकारी व दोन कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत गणेशभक्तांना सेवा देणार आहेत, हे विशेष.या ठिकाणी राहणार कृत्रिम हौदवर्धा शहरातील दादाजी धुनिवाले मठ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मगनवाडी भागातील बजाज बालमंदीर चौक, सोशालिस्ट चौक, आर्वी नाका चौक, बजाज चौक, महात्मा गांधी पुतळा चौक, रामनगर भागातील गर्जना चौक या ठिकाणी न.प.च्यावतीने गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद ठेवण्यात येणार आहेत.वैद्यकीय जनजागृती मंचचा पुढाकारवर्धा शहरातील हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने यंदाही तीन विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. मागील वर्षी २ हजार २०० गणेशमुर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले होते. यातील माती ही नि:शुल्क शहरातील मूर्तीकारांना वैद्यकीय जनजागृती मंचने दिली आहे. त्यातून यंदा ४०० मातीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. यंदाही ४ हजार मूर्ती विसर्जनाची तयारी केली आहे, हे उल्लेखनिय.वर्धेकरांनी मागणी वर्षी आमच्या पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. संभाव्य प्रदुषण टाळण्यासाठी यंदाही आम्हाला वर्धेकरांची साथ गरजेची आहे. गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन न.प.च्या कृत्रिम हौदात करावे.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न. प. वर्धा.