शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षण’ राष्ट्र निर्माण व नागरिकांना संघटित करते

By admin | Updated: November 13, 2016 00:44 IST

नई तालीम शिक्षण प्रणाली जीवनाशी संबंधीत आणि जीवन घडविण्याची शिक्षण पद्धती आहे.

सुगन बरंठ : नई तालीम परिसरात राष्ट्रीय परिसंवादसेवाग्राम : नई तालीम शिक्षण प्रणाली जीवनाशी संबंधीत आणि जीवन घडविण्याची शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे ती जीवनाच्या शेवटपर्यंतची चालणारी प्रक्रिया आहे. समताधिष्टीत समाज कसा बनेल आणि आपले कर्तव्य पूर्ती करण्याची भावना अधिक प्रभावी बनावी या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण फक्त शाळा व महाविद्यालयातच नाही तर समाज दृष्टीकोणातूनही मिळते. शिक्षण हे राष्ट्र निर्माण व नागरिकांना संघटीत करण्याचे काम करते, असे प्रतिपादन नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी केले.नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी मंत्री प्रदीपदास गुप्ता, आनंद निकेतनच्या संचालिका सुषमा शर्मा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी डॉ. बरंठ यांनी नई तालीम शिक्षण प्रणालीचे महत्व व आवश्यकता यावर मत मांडले.मंत्री प्रदीपदास गुप्ता यांनी नई तालीमला देशभऱ्यात पसरविण्याची गरज आहे. त्याची सार्थकता वर्तमान परिस्थिती आणि शिक्षणातून सिद्ध होणार असल्याचे सांगितले. सुषमा शर्मा व सहकाऱ्यांनी दहा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रा. सीमा पुसदकर, प्रा. किरण धांदे, प्रा. उर्मिला हाडेकर इत्यादींनी सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी यांच्या समन्वयातून जि.प.च्या शाळेत गुणवत्तापूर्व शिक्षण कसे दिले जाते. व त्याचे परिणाम किती सकारात्मक आहेत, यावर मत मांडले. तर प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी गुणवत्ता पूर्ण सार्थक शिक्षण अभियानांतर्गत झालेल्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी न.पा. शिक्षण प्रणाली कसी राबविता येईल यावर विचार विनीमय करण्यात आले. न.पा.चे शिल्पकार मॉ. बाबा यांची मुलगी मितूट परिसंवादात सहभागी झाल्या. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उडीसा, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील ६० प्रतिनिधी या परिसंवादात सहभागी झाले आहे. संचालन प्रा. प्रदीप दासगुप्ता व प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी केले. या परिसंवादात शिक्षण विभागातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.(वार्ताहर)