शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

बालवैज्ञानिकांनी साकारल्या पर्यावरणपूरक प्रतिकृती

By admin | Updated: January 6, 2015 23:07 IST

स्थानिक निर्मल इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वामन गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. निलेश पांढरे, अविनाश गोहाड, वसंत उपाध्ये, मेघना भट्ट आदी

आर्वी : स्थानिक निर्मल इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वामन गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. निलेश पांढरे, अविनाश गोहाड, वसंत उपाध्ये, मेघना भट्ट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांढरे यांनी शालेय विद्यार्थ्यांतील जिज्ञास वृत्ती जोपासण्याकरिता विज्ञान प्रदर्शन आवस्यक असयाचे मत व्यक्त केले. प्रा. गायधने यांनी वैज्ञानिक दृष्टीकोण व विद्यार्थ्यांची जडणघडण यावर मार्गदर्शन केले. यासह उपस्थित मान्यवरांनी समायोचित विचार व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनात तारांगण, सिंपल मशीन, वाटर हार्वेस्टिंग सिस्टम, पिन होल कॅमेरा यावर उपकरणे सादर केले. यावेळी क्राफ्ट प्रदर्शनाचेही मान्यवरांनी अवलोकन केले. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार रागिनी राऊत यांनी केले. आयोजनाला संजय वाघमारे, स्नेहलता निकाळजे, प्रिया जिचकार, हेमलता रावेकर आदींनी सहकार्य केले. देवळी तालुका नाचणगाव : येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष सतीश राऊत, प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती भगवान भरणे, पं.स. सदस्य वर्षा घोडेस्वार, किशोर मडावी, सरपंच सुनिता जुनघरे, हरिभाऊ चांदोरे, नरेश हणमंते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक प्रतिकृती सादर केल्या. यासह अक्षय उर्जा, प्रदुषण याबाबत प्रतिकृती मांडण्यात आल्या. प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक इंडीयन मिलीटरी स्कूल, पुलगाव येथील शंतनू आसोले याने मिळविला. तर द्वितीय स्थानमॅडमवार विद्यालय, टाकळी येथील प्रणय पवार, तृतीय आर. के. हायस्कूल पुलगाव येथील आचल पागोटे, यांना देण्यात आले. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक लेबर कॅम्प पुलगाव येथील अश्वजित पाटिल, द्वितीय जनता विद्यालय, देवळी येथील गीत राऊत, तृतीय स्थानावर सम्यक विद्यालय, शिरपूर येथील संकेत भेले याने मिळविला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विजय जाधव, प्रा. वीणा काळे यांनी केले तर आभार विज्ञान शिक्षक संगिता धाबे यांनी केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)