शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धाम नदी पात्रात सर्वत्र घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:05 IST

आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी पवनारला ओळख. मात्र, येथील धाम नदीच्या पात्राला सध्या अस्वच्छतेचा विळखा आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती जमा झाली आहे.

ठळक मुद्देनदीपात्र कोरडे : धार्मिक विधी कामातही अडचण

ऑनलाईन लोकमतवर्धा : आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी पवनारला ओळख. मात्र, येथील धाम नदीच्या पात्राला सध्या अस्वच्छतेचा विळखा आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती जमा झाली आहे. शिवाय दुर्गंधीयुक्त पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने धाम नदी स्वच्छ करण्याची मोहीम नाम फाऊंडेशनच्या मदतीने हाती घेतली असली तरी पवनारपर्यंत अजूनही हे काम पोहोचलेले नाही. त्यामुळे नदीपात्र घाणीने भरून आहे.पवनार आश्रमच्या परिसरातून धाम नदी वाहते. या धाम नदीवर बंधारा बांधून पाणी रोखून धरण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात आता पाणी शिल्लक राहिलेले नाही. शिवाय नदीजवळूनच राज्यमार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नदीतच मातीचा भराव टाकण्यात आला आहे. दुर्गा व गणेश मूर्तींचे विसर्जन या नदीपात्रात करण्यात आले. अनेक प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती नदीपात्रात अजूनही पडून आहेत. त्या पाण्यात मुरलेल्या नाहीत. नंदी घाटाच्या भागाकडून असलेल्या घाटावर सर्वत्र चिखल व चिंधी कापड पडून आहेत. येथे पाण्याचे डबके नदीपात्रात तयार झाले आहे. तेथे विविध साहित्य कूजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तेथे अनेकजण पिंडदान व दशक्रियेच्या विधीसाठी येतात; पण नदीपात्रात पाणी नसल्याने या धार्मिक विधीतही अडचण निर्माण होत आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने अनेकांना बोरवेलच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी पवनारच्या ग्रामस्थांची आहे.पवनार विकास आराखड्याचे काम रखडलेआश्रमच्या बाजूकडून दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेले पवनार विकास आराखड्यातील काम सध्या थांबलेले आहे. आश्रममधील विश्वस्तांनी या कामांवर काही आक्षेप घेतल्यामुळे हे काम थांबविण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे एकूणच धाम नदीच्या स्वच्छतेबाबत व विकासाबाबतची मोठी अनास्था दिसून येत आहे. धाम नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण पाण्यावर शेवाळ जमा झाले आहे. तसेच नदीमधील दगडांच्या मध्येही घाण पाणी जमा होऊन आहे.

टॅग्स :riverनदी