शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांमुळे सामाजिक कार्याला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:27 IST

१९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज्येष्ठ समाजसेविका तथा सर्चच्या संचालिका पद्मश्री राणी अभय बंग यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराणी बंग : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा

वर्धा : १९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज्येष्ठ समाजसेविका तथा सर्चच्या संचालिका पद्मश्री राणी अभय बंग यांनी व्यक्त केले.वर्धा सोशल फोरमच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अनेकांत स्वाध्याय मंदिर परिसरात सपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे तर प्रमुख पाहूणे म्हणून सेल येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नेहा मोहीत पंचारिया यांची उपस्थिती होती. यासोबतच सत्कारमूर्ती ज्येष्ठ गांधीवादी करुणा फुटाणे, हिंगणघाटच्या कवयित्री मंजिरी भोयर (कोठेवार), आरंभा अनाथालयाच्या संचालिका माधवी शिवाजी चौधरी व बोरी येथील मॉ दुर्गा दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रमीला वाघाडे यांचीही मंचावर उपस्थिती होती. राणी बंग यांनी उपस्थितांसोबत संवाद साधताना आपल्या जीवानाचा प्रवास उलगडा केला. आयुष्य हे सदैव रेड कार्पेट नसते, कधी अपयशही पचवता आलं पाहिजे. कारण अपयशामुळे आपल्यासमोर येणाऱ्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच केवळ कायद्यात बदल करुन चालणार नाही तर पालकांनी पालकत्व निभविताना आपल्या पाल्यांना सुसंस्कृत व निर्भय बनवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी पालकांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मेघे यांनी फोरमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती देत मार्गदर्शनही केले. यावेळी राणी बंग यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्कारमूर्तींना बंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी मनोगतातून सर्व सुविधा मिळणे म्हणजे सक्षमिकरण नाही तर उद्याची सक्षम व सुसंस्कारीत पिढी घडविणे म्हणजेच सशक्तिक रण होय असा सूर आवळला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिल्पा सातव यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन मनिषा मेघे यांनी केले तर आभार फोरचे सचिव अविनाश सातव यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धेकरांसह सोशल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.