लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : येथील शेतकरी शीला पठाडे, साहेबराव पठाडे, अनिल पठाडे व गणेश पठाडे यांची शेतात ये-जा करण्याची वहिवाट अडविल्याने त्यांच्या मालकीचे सोयाबीन सध्या शेतातच ढीग करूनच आहे. या प्रकरणी योग्य कार्यवाही म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने सदर शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुका प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता या प्रकरणी त्वरित योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी या शेतकºयांची आहे.सदर शेतकऱ्यांची शेत जमीन जामणी शेत शिवारात आहे. तसेच याच परिसरात शोभा डोईफोडे यांच्या मालकीचे शेत असून त्यांनी त्या शेतकºयांची वहिवाट अडविल्याची तक्रार सदर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लेखी स्वरूपात केली. ही तक्रार देऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप ही समस्या निकाली निघाली नाही. डोईफोडे यांच्या शेताजवळून तक्रारकर्त्या शेतकºयांना ये-जा करण्यासाठी वहिवाट होती. पठाडे यांची शेती वडलोपार्जित असून पूर्वीपासून याच रस्त्यानी बैलबंडीची ये-जा होत होती. परंतु, यंदा डोईफोडे यांनी शैलेश वरघणे यांना शेत शेतीसाठी मक्त्याने दिले. शिवाय त्यांनी ये-जा करण्याचा मार्गच बंद केल्याचे तक्रारकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतात ये-जा करण्याचा मार्गच बंद करण्यात आल्याने सध्या तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या मालकीचे सोयाबीन कापून ढिग करून आहे. सोयाबीन मळणी यंत्र शेतात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतकvच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणी योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
वहिवाट अडविल्याने सोयाबीन शेतातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:48 IST
येथील शेतकरी शीला पठाडे, साहेबराव पठाडे, अनिल पठाडे व गणेश पठाडे यांची शेतात ये-जा करण्याची वहिवाट अडविल्याने त्यांच्या मालकीचे सोयाबीन सध्या शेतातच ढीग करूनच आहे. या प्रकरणी योग्य कार्यवाही म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वहिवाट अडविल्याने सोयाबीन शेतातच
ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण वाढली : तालुका प्रशासनाची भूमिका बघ्याची?