शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतकरी सुखावला

By admin | Updated: June 11, 2017 00:44 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळवाहीची कामे आटोपली असून पावसाकडे त्याच्या नजरा लागल्या होत्या. पावसाची त्याची प्रतीक्षा शनिवारी संपली.

कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पावसाच्या सरी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळवाहीची कामे आटोपली असून पावसाकडे त्याच्या नजरा लागल्या होत्या. पावसाची त्याची प्रतीक्षा शनिवारी संपली. जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. यात काही ठिकाणी जोरदार तर कुठे पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरात सायंकाळी चांगलाच पाऊस आला. तर झडशी, पवनार, आष्टी, नंदोरी, चिकणी (जामणी) व वर्धेत पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. ज्या भागात जोराचा पाऊस आला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ करण्याची तयारी केली आहे. तर ज्या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्या भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून आले आहे. कोरा परिसरात पावसासह वारा असल्याने येथे काही प्रमाणात नुकसान झाले. येथील नाईक यांच्या वाड्यावरील छत उडाले. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्याचे दिसून आले. यासह गावातील बाळू लोखंडे, प्रवीण आत्राम, सतीश आत्राम, संजय वैरागडे, सूर्यवंशी, रमेश भोयर यांच्या घरावरील टीना उडाल्या. शाहु पंढरे यांच्या शेतातील गोठ्याचे नुकसान झाले. पावसासह आलेल्या वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असून त्यांच्याकडून रविवारपासून पेरणीच्या कामाला प्रारंभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज कोसळून चार बैल ठार नाराणपूर/ गिरड : समुद्रपूर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यात वीज पडून चार बैल ठार झाले आहे. नारायणपूर शिवारातील सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीची बैलजोडी ठार झाली. त्यांची जोडी शेतात बांधून होती. यात त्यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. तर याच काळात गिरड लगतच्या केसलापूर शिवारात वीज कोसळून अनिल कामडी यांची बैल जोडी ठार झाली. त्यांची बैलजोडीही शेतात बांधून होती. ऐन हंगामाच्या तोंडावर आलेल्या या आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.