शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यामुळे अपघात, कुटुंब उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:49 IST

पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत.

ठळक मुद्देनागरिकांत आक्रोष : मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : पावसामुळे खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याची चाळणी झाली आहे. दुतर्फा बाभुळ झुडपाने वेढा घातला आहे. यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत. परिणामी, अपघातांत वाढ झाली आहे. अशाच एका अपघातात पती-पत्नी जखमी झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. दोन दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. यामुळे कार्यकारी अभियंत्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंतोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकरे यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले.खडकी-अंतोरा-बेलोरा रस्ता क्र. ३३ वर ०/१०० ते १६/६०० किमी दरम्यान किन्हाळा ते खंबितपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाभळीची झाडे वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही व अपघात होतात. माणिकनगर गावाजवळ एक मोठा खड्डा आहे. येथे अपघाताचे सातत्य आहे. माणिकनगर येथील ज्योती रवी गेडाम या पतीसह दुचाकीवर जात असताना खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कुटुंबाला आतापर्यंत उपचारासाठी १० लाख रुपये खर्च करावे लागले; पण अद्याप प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांचे पती रवी यांच्यावरही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. एका खड्ड्यामुळे या कुटुंबाचा अख्खा संसार उघड्यावर आला. अंतोरा येथील अतुल वानखडे पत्नीसह मोर्शी येथे जात असताना याच खड्ड्यात पडले. यामुळे त्यांनाही गंभीर मार लागला. उपचारासाठी हजारो रुपये खर्च आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी, उपविभाग आष्टी यांना निवेदन देण्यात आली; पण खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही. यामुळे दोषी व जबाबदार कार्यकारी अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, जखमींच्या कुटुंबियाना मदत द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. उपविभागीय अभियंता कार्यालयात निवेदन ठाकरेसह डॉ. नरेंद्र देशमुख, अरविंद पांडे, अनिल ठाकरे, अंकित मोहोड, मंगेश नागपूरे, राजेश नागपूरे, नामदेव लोखंडे उपस्थित होते.