शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पंचमस्तंभीय प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:45 IST

देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय.

ठळक मुद्देकुमार केतकर : दिनकरराव मेघे व्याख्यानमालेत विद्यमान व्यवस्थेवर केला प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय. लोकशाहीला दगा देणारी शक्ती म्हणजे पंचम स्तंभ होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.प्राचार्य दिनकर मेघे व्याख्यान मालेत लोकशाही स्तंभ आणि पंचम स्तंभ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. एन.एन. ठेंंगरे होते. यावेळी मंचावर सरीता मेघे, श्रीकांत बाराहाते उपस्थित होते.कुमार केतकर म्हणाले की, सध्या देशात पंचम स्तंभीय प्रवृत्ती निर्माण झाली आहे. त्यांनी देशाचा मिडीया आपल्या ताब्यात घेतला असून न्याय व्यवस्था, पोलीस गुप्तचर यंत्रणा आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रवृत्तीमुळे लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना अशा प्रवृत्तींचा बिमोड करण्याची व लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. एकीकडे या देशाचे पंतप्रधान अमेरिकेत जावून इस्लामिक दहशतवादावर भाषण देतात. मात्र २००२ गुजरात दंगलीत झळ बसलेले २ हजार इस्लाम धर्मिय अजून ही निर्वासितांच्या छावणीत आहे. त्यांची भेट घ्यावी, असे देशाच्या पंतप्रधानाला वाटत नाही.ज्यावेळी १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाचा राष्ट्रध्वज आपल्या कचेºयांवर फडकविला नाही. कारण हिंदु राष्ट्र निर्माण झाले नाही. ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण झाले अशी त्यांची धारणा होती. १९८० ते १९८४ या कालावधीत ६० हजार शिख दहशतवादी कारवायात मारल्या गेले. पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येनंतर दिल्लीत ३ हजार शिख मारल्या गेले. या तीन हजार लोकांच्याच हत्याकांडाची चर्चा पंचम स्तंभीय प्रवृत्ती करते, असे केतकर म्हणाले.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार करून जगातील ३० देशांना एक संघ केले होते. त्यानंतर इंदिराजींनी हे कार्य पुढे नेले. आज अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीतून भारत बाहेर पडला आहे. नेहरूंनी निर्माण केलेल्या प्रत्येक बाबी नष्ट करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. नियोजन आयोग गुंडाळण्यात आला. मुंबईतील नेहरू इंस्टिट्युट या संस्थेचे विज्ञान कार्याचे अनुदान बंद करण्याचे काम सुरू झाले आहे. संस्थेचे नाव बदलवा असा निरोप या संस्थेच्या पदाधिकाºयांना देण्यात आला आहे.भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास बदलविण्याचे काम पंचम स्तंभीय प्रवृत्ती करीत आहे. १९३३ महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न सुरू झाला. १९४८ ला गांधीजींची हत्या झाली. जवळ जवळ चार न्यायालयाने संपूर्ण पुराव्यासह गांधी हत्येचा निकाल दिला. तरीही आज गांधी हत्येच्या पुन्हा तपासाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका दाखल करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते कुमार केतकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार अमर काळे, आमदार डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय श्रीकांत बाराहाते यांनी करून दिला संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले.