शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे उठले वाहनचालकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:57 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गावर सध्या छोट्या-मोठ्या वाहनांसह जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत.

ठळक मुद्देवर्धा-हिंगणघाट मार्गाची दैना : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावर सध्या छोट्या-मोठ्या वाहनांसह जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. सदर खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून एखादी मोठी घटना घडल्यावरच खड्डे बुजवाल काय, असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे. परिणामी, सदर प्रकरणी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.कारंजा (घा.) व यवतमाळ येथून हैद्राबादच्या दिशेने जाणारी जड वाहने वर्धा होत पुढील प्रवासाकरिता निघतात. वर्धा-हिंगणघाट मार्गावर भुगाव शिवारात दोन मोठ्या कंपन्या असून या कंपन्यांमध्ये वर्धा शहरासह आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश तरुण कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्ये कामगारांच्या कामाची पाळी बदलत असताना कर्तव्यावर येणाºया व कर्तव्य संपल्यानंतर दुचाकीने परतीचा प्रवास करणाºयांची मोठी वर्दळ असते. त्यातच वर्धेकडे येणाºया व वर्धेकडून हिंगणघाटच्या दिशेने जाणाºया जड वाहने त्यात अधिक भर टाकतात. सुसाट वाहने पळविणारे जड वाहनचालक बहुदा दुचाकी चालकांना मार्गच देत नाहीत. इतकेच नव्हे तर या मार्गावर बोरगाव परिसरातील फार्मसी महाविद्यालय संपल्यानंतर जीवघेणे ठरणाºया खड्ड्यांची शर्यतच असल्याचे बघावयास मिळते. सदर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याकडे संबंधीतांचेही दुर्लक्ष होत आहे. एकूणच या परिस्थितीमुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. रस्ता अपघातात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. वाहनचालकांना या मार्गाने प्रवास करताना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत असून वर्धा-हिंगणघाट रस्त्याच्या दैनावस्थेचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आहे.रुग्ण व गर्भवती महिलांना सर्वाधिक त्रासवर्धा-हिंगणघाट मार्गावरील इंझापूर, भुगाव, वायगाव (नि.) तसेच कानगाव आदी गावांमधील रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी येथील रुग्णालयात व सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात येते. याच मार्गाने रुग्ण व गर्भवती महिलांनाही सदर रुग्णालयांमध्ये नेले जाते. वर्धा-हिंगणघाट मार्गावरील खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास रुग्ण व गर्भवती महिलांना सहन करावा लागत आहे.दुचाकीवरील दोघे तरुण गंभीरवर्धा-हिंगणघाट मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यामधून दुचाकी उसळून झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आशीष यादव व कैलास ससे दोन्ही रा. बोरगाव (मेघे), अशी गंभीर जखमी तरुणांची नावे आहेत. जखमी झालेले दोन्ही तरुण भुगाव येथील कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. ते दुचाकीने ड्युटीवर जात असताना हा अपघात झाला. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.