शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या रोडावल्याने रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी नगण्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हर हे इंजेक्शन दिले जाते. रेमडेसिव्हर या इंजेक्शनची विविध नामांकित कंपन्यांनी निर्मिती केली असून किमतीही वेगवेगळ्या आहेत. झायडस कॅडिला कंपनीचे इंजेक्शन प्रधानमंत्री जनआरोग्य केंद्रात रुग्णांना २ हजार ३६० या सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. सिप्ला कंपनीचे सिप्रीमी ३ हजार २०० रुपयांना उपलब्ध होत आहे. हेट्रो आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांचे रेमडेसिव्हर इंजेक्शन ५ हजार ४०० रुपयांचे असून १५ टक्के सवलतीच्या दरात म्हणजेच ३ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देशहरातील विक्रेत्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध, सेवाग्राम येथील रुग्णालयाला केंद्र शासनाकडून होतो पुरवठा

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय या दोन रुग्णालयांना राज्य शासनाने कोविड रुग्णालयाचा दर्जा प्रदान केला. या दोन्ही रुग्णालयात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्याच कमी होत असल्याने रेमडेसिव्हर इंजेक्शनला मागणीच नाही. मागील पंधरवड्यापासून स्टाकिस्टकडे रुग्णालयांकडून रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी नाही. या इंजेक्शनचा वैधता कालावधी केवळ तीन महिनेच असल्याने स्टाकिस्ट इतरत्र पुरवठा करण्यात अथवा कंपनीला परत करण्याच्या मानसिकतेत आहेत.आरोग्य यंत्रणा अनभिज्ञजिल्ह्यात दररोज किती इंजेक्शन लागतात, साठा किती आहे, यासंदर्भात माहितीकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती देण्यास कायम टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.मेडिकलची यादीसाईनाथ एजन्सीजश्रीकृष्ण एजन्सीजकमलेश एजन्सीजया ठोक विक्रेत्यांकडे केवळ हे रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहे. एकाही खासगी रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा नसल्याने खुल्या बाजारात उपलब्ध झालेले नाही.जिल्ह्यात विविध कंपन्यांचे निरनिराळे दरमध्यम आणि तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हर हे इंजेक्शन दिले जाते. रेमडेसिव्हर या इंजेक्शनची विविध नामांकित कंपन्यांनी निर्मिती केली असून किमतीही वेगवेगळ्या आहेत. झायडस कॅडिला कंपनीचे इंजेक्शन प्रधानमंत्री जनआरोग्य केंद्रात रुग्णांना २ हजार ३६० या सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. सिप्ला कंपनीचे सिप्रीमी ३ हजार २०० रुपयांना उपलब्ध होत आहे. हेट्रो आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांचे रेमडेसिव्हर इंजेक्शन ५ हजार ४०० रुपयांचे असून १५ टक्के सवलतीच्या दरात म्हणजेच ३ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आणि आधार कार्ड दाखविल्यानंतर रुग्णांना हे रेमडेसिव्हर इंजेक्शन स्टॉकिस्ट आणि कोविड रुग्णालयांकडून उपलब्ध करून दिले जात आहे, अशी माहिती औषधी निरीक्षक सतीश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या