शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाअभावी मृतदेह तीन तास घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी म्हाताऱ्या आईला छाती दुखते असे सांगितले. त्यामुळे त्यांना आईने लिंबूपाणी दिले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे शवविच्छेदन करुन कोरोना चाचणी करावी तसेच अहवाल प्राप्त होईपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवावा, अशी मागणी गावकऱ्यांची होती.

ठळक मुद्देशवविच्छेदनाचा प्रश्न : प्रशासनालाच करावे लागले अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील जाम येथील वाहनचालकाचा तापाने घरीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन व कोरोना चाचणी करुन मृतदेह शीतगृहात ठेवण्याची व्यवस्था समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नसल्याने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा विचार सुरु झाला. पण, समुद्रपूर की हिंगणघाट याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांंमध्ये एकमत होत नसल्याने तब्बल तीनतास मृतदेह घरातच पडून राहिला. अखेर समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात चाचणी व शवविच्छेदन करुन प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले.बंडू गुलाब बागेश्वर (४७) रा. जाब असे मृताचे नाव आहे. हा व्यक्ती वाहनचालक असून त्याचे नेहमीच बाहेर जिल्ह्यात आणि राज्यातही जाणे-येणे सुरुच होते. गेल्या दहा दिवसापासून बंडू यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने ते घरीच आजारी होते.मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी म्हाताऱ्या आईला छाती दुखते असे सांगितले. त्यामुळे त्यांना आईने लिंबूपाणी दिले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे शवविच्छेदन करुन कोरोना चाचणी करावी तसेच अहवाल प्राप्त होईपर्यंत मृतदेह शीतगृहात ठेवावा, अशी मागणी गावकऱ्यांची होती. त्यानुसार जामचे सरपंच सचिन गावंडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भगत यांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलाविली. पण, पीपीई किट नसल्याने मृतदेह उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. सोबतच समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास अडचणी मृतदेह समुद्रपूरला न्यायचा की हिंगणघाटला याबाबत समन्वय नसल्याने बराच वेळ नागरिकांना ताटकळ करावी लागली. अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशानुसार समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात स्वॅब नमुने घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. मृत कोरोना संशयीत असल्याने गावकऱ्यांसह नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रशासनोच अंत्यसंस्कार केले. यावेळी प्रभारी तहसीलदार महेंद्र सुर्यवशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलीस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, तालुका वैदकीय अधिकारी डॉ. सुनील भगत, पोलीस पाटील कवडू सोमलकर, सरपंच सचिन गावंडे, ग्रामसेवक धोटे, तलाठी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या