शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांमुळे अवैध सावकारीला चाप

By admin | Updated: August 29, 2014 00:01 IST

ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे़ कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ

वायगाव (नि.) : ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे़ कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ सध्या शेतकऱ्यांना होताना दिसतोय़ बँकेचे कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत होते़ आता बचत गटांद्वारे शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होऊ लागला आहे़ यामुळे अवैध सावकारीला चाप बसला आहे़महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल ग्रामीण भागात वाढीस लागली आहे़ यामुळे सावकाराकडून पैसे घेणाऱ्यांची संख्याही कमी व्याजदाराने वापरता येत आहे. यामुळे एकप्रकारे महिला बचत गटामुळे पुरुषाच्या सावकारीला आळाच बसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत चालले आहे. पुरुषाच्या बचत गटाबरोबरच महिलांनीही बचत गटाची स्थापना केली़ या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागत असल्याचे दिसते़ जिल्हाभरात अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत़ सध्या ते चांगल्या प्रकारे सुरू आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटाचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फायदा होत आहे. बी-बियाणे, खते, औषधी, खरेदीसाठी अनेक शेतकरी महिलांच्या बचतगटातील पैसे वापरले जात असल्याचे दिसते़ शिवाय बचत गटातील रकमेचे व्याज दरही कमी असतात. यामुळे पूर्वीप्रमाणे खासगी सावकाराकडून व्याजाचे पैसेही घेण्याची गरज नाही. ग्रामीण भागात अनेकदा खासगी सावकारांनी शेतकऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या जमिनी बळकावल्या़ अनेकांनी सावकाराचे पैसे देणे होत नसल्याने आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने दुबार तर तिबार पेरणी करावी लागली़ यात बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी मोठा खर्च आला़ ही आर्थिक कामे शेतकरी महिला बचत गटातून शेतकऱ्यांना करता आलीत़ महिला बचत गटांची शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जाण्यास मदतच झाल्याचे दिसते़(वार्ताहर)