शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी

By admin | Updated: June 26, 2014 23:28 IST

करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे.

वर्धा : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे. त्यातूनच खासगी शिकवण्यांनाही गर्दी वाढत असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून दिसून येते. मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असल्यानेच शिकवणी लावल्याचे अनेक पालकांनी म्हटले आहे. तसेच, ‘केजी’पासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जात असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आले.आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, यासाठी त्याला जास्तीत-जास्त पुरक शिक्षण दिले जाते. मग या पुरक शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जेतात. योग्य शाळा लावणे, घरी वेळच्या-वेळी अभ्यास घेणे, त्याचबरोबर पाल्यास योग्य शिकवणी लावणे याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे केजीपासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जाते. मुले इंग्रजी माध्मयात शिकत असल्याने शिकवणी लावत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार केजी ते इयत्ता चौथीपर्यंत शिकवणी लावण्याचे हे प्रमाण ३४ टक्के आहे. साधारणत: एवढेच म्हणजे ३७ टक्के आठवी ते दहावीतील मुले शिकवणीला जातात. इंग्रजी माध्यमामुळे शिकवणी लावली असल्याचे तब्बल ७२ टक्के पालकांनी सांगितले आहे. बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांना शिकवणी लावणे गरजचे झाले आहे. पुढच्या वर्गात जाण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही वाढत जातो. आठवी व नववी हा दहावीचा पाया मानला जातो म्हणून शिकवणीची गरज पडते. पण, ज्युनियर-सिनियर के .जी. पासूनच मुलांनाही शिकवणी लावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)