शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हिरावल्याने २५ कुटुंबांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:08 IST

खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली.

ठळक मुद्देखडकी मंदिरासमोरील दुकाने हटविली : संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साहित्य घरी घेऊन जात जागा मोकळी करून दिली. परंतु, शासनाने त्यांना देऊ केलेला मोबदला जमीनमालकाच्या खोटारडेपणामुळे मिळण्यास विलंब होत असल्याने दुसरीकडे कुठे व्यवसाय उभा करायचा व त्याकरिता लागणारे भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न या लघु व्यावसायिकांना भेडसावत आहे. या सर्व हॉटेल व्यवसायिकांचा रोजगार हिरावण्यापूर्वी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांना जागा उपलब्ध करुन द्यायची होती. परंतु, असे झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सुमारे ४० वर्षापासून मोहम्मद मुमताज हबीब अन्सारी, जमील खान मोहम्मद युसूफ, गजानन रामाजी राऊत, ताहिर अली इनायत अली, मोहम्मद शकील खाान आदी व्यावसायिक किरायाच्या जागेवर हॉटेलचे शेड उभारून व्यवसाय करीत होते. मात्र, जागामालकाने ही सर्व दुकाने स्वत:चीच असल्याचे भासवून दुकानमालकाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम स्वत:च हडपण्याचा डाव आखला होता. याची कुणकुण या व्यावसायिकांना लागताच यावर शासनाकडे आक्षेप घेतला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नुकसान भरपाईचा मोबदला प्रलंबित आहे. जमीनमालकाने त्याच्या जागेवर असलेली वेगवेगळ्या व्यावसायिकांची दुकाने स्वत:चीच असल्याचे भासविण्याकरिता खडकीचा ग्रामसेवक, तलाठी यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे शासनाकडे सादर केल्याचा आरोप या सर्व व्यावसायिकांनी केला आहे. तसेच सेलूच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी चुकीचे मूल्यांकन केल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केला आहे. या हॉटेलसोबत तेथील सिरादिननिसा इकबाल खान, शमसुनिसा इकबाल खान व शरफुनिसा शेख उस्मान यांची घरेसुद्धा या महामार्गात जात आहेत. त्यांचाही मोबदला अडकल्याचे सांगण्यात आले.शेतीचा वाढीव मोबदलाही मिळाला नाहीमहामार्गात गेलेल्या शेतात आंब्याची झाडे होती तसेच ओलिताची शेती कोरडवाहू दाखविण्यात आली होती. यात शेतकऱ्यांकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, त्याचा शासनाकडून अद्याप वाढीव मोबदला देण्यात आल्या नसल्याचा आरोप मुजाहिद आणि मोहम्मद अली यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.जमीन मालकाने पटवारी व ग्रामसेवक यांना हाताशी घेऊन व चिरीमिरीच्या मोहात बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. आमच्या मालकीचे हॉटेल, दुकान स्वत:चे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल केली. आम्हाला मिळणारा हक्काचा नुकसानीच्या मोबदला हडपण्याचा प्रयत्न केला. याची सखोल चौकशी करण्यात यावी.- इकबाल खान, किरकोळ व्यावसायिक, खडकी (आ.)

टॅग्स :KhadkiखडकीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग