शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पात्र आदिवासींना डावलून शासकीय कर्मचारी, पेन्शनधारकांना घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:23 IST

आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या सोरटा ग्रा. पं. मधील गैरप्रकार एकापाठोपाठ एक उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ग्रा.पं. मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले होते. तर आता खऱ्या गरजुंना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसोरटा ग्रा.पं.चा गैरप्रकार : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या सोरटा ग्रा. पं. मधील गैरप्रकार एकापाठोपाठ एक उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ग्रा.पं. मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले होते. तर आता खऱ्या गरजुंना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.चौदाव्या वित्त आयोगाच्या सुमारे २० लाखाचे प्रकरण ग्रा.पं. सदस्य हंसराज उर्फ रोशन मुडे यांनी उघडकीस आणून तशी तक्रारही जिल्हाधिकाºयांसह जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणी वेळोवेळी पाठपूरावा करण्यात आला; पण कुठली कारवाई करण्यात आली हे अद्यापही गुलदस्त्यातच ठेवले जात आहे. हा गैरप्रकार ताजा असतानाच आता पात्र आदिवासींना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले आहे.याबाबतची माहिती मिळताच एस.सी.,एस.टी शिक्षण हक्क परिषदेचे संयोजक मारोती उईके त्यांच्या सहकार्यांनी सोरटा गाठून संपूर्ण माहिती जाणून घेत योग्य कारवाई व्हावी या मागणीची तक्रार प्रकल्प संचालक व जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना केली आहे. या तक्रारीची प्रत गटविकास अधिकाºयांनाही देण्यात आली आहे. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देताना संबंधित अधिकाºयांनी खºया गरजुंना जाणीवपूर्वक डावलून शासकीय कर्मचारी व पेंशन धारकांना योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे तक्रारीत नमुद आहे. हा प्रकार कष्टकरी वर्ग असलेल्या आदिवासी बांधवांवर अन्याय करणाराच असल्याने त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भातील प्रत्येक पुरावा आपल्याकडे असून तो चौकशीदरम्यान आपण चौकशी अधिकाºयांसमक्ष ठेवून असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरणी तात्काळ योग्य कारवाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना मारोती उईके यांच्यासह हंसराज मुडे, गोपाल घोगारी, प्रभाकर चौरे, गोपाल काळे, अशोक निकम, हरिभाऊ मांडवगडे, प्रतिक जिचकार, विजय कोहचाडे, रविंद्र थुल आदींची उपस्थिती होती.