शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत टाकली जाणार जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:37 IST

शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे तत्काळ कार्यवाहीचे निर्देश : भोयर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. आ. भोयर यांनी याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी केली. शहर व लगतच्या १३ गावांमध्ये धाममधून पाणीपुरवठा करण्यात येतो.शहराला नगर परिषद तर १३ गावांना जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. येळाकेळी येथील पंपिंग स्टेशनवरून हा पाणीपुरवठा करण्यात येतो. महाकाली धरणातून पाणी सोडल्यानंतर ते येळाकेली येथील बंधाऱ्यावर अडविण्यात येते. परंतु, अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी धरणात जलसंचय कमी झाला. परिणामी, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. धरणाची उंची वाढविल्यास पाणी समस्या निकाली निघेल सोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी मिळेल. याबाबत पाठपुरावा करूनदेखील कार्यवाही झाली नाही. प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. उन्हाळ्यात महाकाळी जलाशयातून वर्धा व लगतच्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात येते. अंतर अधिक असल्याने २५ टक्के पाणी केवळ येळाकेलीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत पाईपलाईन टाकल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच वर्ध्यासह लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणे सोईचे जाईल.