शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पामुळे ‘ती’ चार गावे दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:59 IST

आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत.

ठळक मुद्देमंत्र्यांना साकडे : दादाराव केचेंची गावे पुनर्वसनाची मागणी

आॅनलाईन लोकमतवर्धा : आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. तेथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेती करणेही कठीन झाले आहे. या चार गावांमधील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सदर गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करून गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केलेल्या निवेदनातून माजी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका या गावांमधील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात रोही, जंगली डुक्कर, वाघ, बिबट, अस्वल आदी प्राणी असून रोही व रानडुक्करांचे कळप शेतातील उभ्या पिकांची नासडी करतात. परिणामी, येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवाय वाघ, बिबट व अस्वल आदी वन्यप्राणी शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला करून त्यांना जखमी करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीव मुठीत घेऊन शेतकरी व शेतमजुर शेतातील कामे करीत आहेत. माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका या गावांमधील शेतकºयांसह ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सदर गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करून या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना कुंदन जैस्वाल, अनिल लेंडे, प्रमोद डोळे, साहेबराव नांदुरकर, राजकुमार पेटकुले, सुदाम निकोडे, राधेश्याम जैस्वाल, जयंत चौधरी, अभिजीत जैस्वाल, सचिन इवनाथे, चंदु डोळे, कमलाकर लेंडे, विलास आटे, जगदीश वानखेडे, सुरेश नागोसे, राजु राठी आदींची उपस्थिती होती.