धिरू मेहता : ४६ गावांतील समितीच्या प्रतिनिधींची सभासेवाग्राम : कायद्याने महिलांना हक्क व संरक्षण दिले असले तरी समाजात समानतेची भावना अजून वाढीस लागली नाही. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने समर्थपणे काम करीत असल्या तरी दारूमुळे महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहे, असे मत म. गांधी आरोग्य संस्थेचे अध्यक्ष धिरू मेहता यांनी व्यक्त केले.तळेगाव (टा.) व खरांगणा (गोडे) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सामूदायिक वैद्यक विभागाद्वारे डॉ. सुशीला नायर जन्म शताब्दीनिमित्त ४६ गावांतील ग्राम आरोग्य, पाणी, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या प्रतिनिधींची सभा संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली. अतिथी म्हणून गडचिरोलीचे सामाजिक कार्यकर्ता देवाजी तोफा, संस्थेचे विश्वस्थ परमानंद तापडिया, सचिव डॉ. बी.एस. गर्ग, अधिष्ठाता डॉ. के. आर. पातोंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.व्ही. कलंत्री, सामूदायिक वैद्यक विभाग प्रमुख डॉ. अशोक मेहंदळे, प्रा.डॉ. सुबोध गुप्ता व प्रा.डॉ. चेतना मलिये उपस्थित होते. तोफा म्हणाले, गावाच्या विकासासाठी समस्या व समाधानाचे अध्ययन आवश्यक आहे. लोकसहभागातून विकास कसा साधावा, याचे लेखामेंढा या गावाचे उदाहरण देता येईल. विकासाच्या कामात मी पणा बाजूला ठेवून गावाचा विकास समोर ठेवावा लागतो. सभेला २०१ प्रतिनिधी उपस्थित होते. ४६ गावांत राबविण्यात आलेल्या आरोग्य व स्वच्छतेबाबतचे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले. संचालन डॉ. अभिषेक राऊत यांनी केले तर आभार प्रवीण भूसारी यांनी मानले.(वार्ताहर)
दारूमुळे महिलांवरील अत्याचार वाढले!
By admin | Updated: January 8, 2016 02:54 IST