शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:52 PM

पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे.

ठळक मुद्देपवनूर शिवारातील शेतात हैदोस : तार कुंपणाच्या मागणीकडेही दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.पवनूर येथील लक्ष्मण कोंडलकर यांच्या शेतातील दहा एकरातील कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. यात त्यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले, असा अंदाज शेतकºयाने व्यक्त केला. चांगल्या अवस्थेत असणारे कपाशीचे पीक ऐनवेळी वन्यप्राण्याने उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनरक्षक एन.पी. जाधव यांनी पाहणी केली असून वरिष्ठांना कळविले आहे. यापूर्र्वीही पवनूर शिवारात श्वापदांनी मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान केले होते. वनविभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले होते; पण मिळणारी मदत ही अत्यल्प असल्याने त्यातून नुकसानाची भरपाई होत नाही. यामुळे वनविभागाने कुंपणासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी पवनूर येथील शेतकऱ्यानी केली होती. या मागणीचाही शासन दरबारी विचार करण्यात आला नाही. आता पुन्हा वन्य प्राण्यांची हैदोस घातला आहे. असाच हैदोस सुरू राहिला तर शेतकऱ्यांना उत्पादनच होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.डुकरांनी केले पीक भुईसपाटपिंपळखुटा : सुकळी (उबार) येथील महिला शेतकरी चंद्रकला गोड्डे यांच्या शेतातील डुकरांनी कपाशीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्या-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानीची माहिती वनविभागाला दिली असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. यात तलाठी काही महत्त्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्यने नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा अद्याप होऊ शकलेला नाही. यावर्षी कापूस पिकाला मोठा खर्च आला असून बाजारभाव अल्प आहे. यामुळे यंदाचे कापूस पीक तोट्यात आहे. त्यातच हाताशी आलेले पीक जंगली श्वापदे नष्ट करीत आहेत. यामुळे शेतकरी हतबल असून नुकसानीच्या भरपाईकरिता शेतकऱ्याने वन विभागाला साकडे घातले आहे. वन विभागाने पंचनामे करून पिडीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.