शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद क्षेत्रसहायकाची महिला वनरक्षकाला अश्लील शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. बोलण्याची पातळी सोडून अर्वाच्य भाषेचा वापर करू लागले. हा सर्व प्रकार महिला वनरक्षकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पिलापूर मौजाचे क्षेत्र सहायक एस.बी. बारसे यांनी मद्यप्राशन करून सुजातपूर मौजाच्या महिला वनरक्षक स्वाती वानखडे यांना मोजमाप पुस्तिकेच्या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार मोबाइलमध्ये कैद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविल्याने त्यांनाही हादरा बसला. याप्रकरणी महिला वनरक्षकाने वन विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दिली; परंतु दीड दिवसाचा कालावधी लोटूनही कारवाई झाली नाही. यावरून वन विभाग मद्यपी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वनरक्षक महिलेने केला.बुधवारी वर्धा वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक बी.एन. स्वामी यांचा दौरा होता. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. या कार्यालयाच्या परिसरात पिलापूर वनक्षेत्राचे कार्यालय आहे. दरम्यान, सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. बोलण्याची पातळी सोडून अर्वाच्य भाषेचा वापर करू लागले. हा सर्व प्रकार महिला वनरक्षकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. याप्रकरणी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. गायनेर यांना सर्व हकीकत सांगून लेखी तक्रार दिली. यानंतर सहायक उपवनसंरक्षक स्वामी यांनाही मोबाइलमधील सर्व प्रकार दाखविला. वस्तुस्थितीनुसार कारवाई करण्याची विनंती केली. त्यांनी वर्ध्याच्या उपवनसंरक्षकांना कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना आदेश दिला. मात्र, कालपासून अद्याप यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यानंतर वनसंरक्षक वानखेडे यांनी गुरुवारी आष्टी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली. तरीही ठाणेदारांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. वन विभाग आणि पोलिसांनाकडून या महिला वनरक्षकांना कुठलाही न्याय मिळाला नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत. येत्या आठ दिवसांत न्याय मिळाला नाही, तर न्यायालयात धाव घेऊन वन विभागासमोर उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  या प्रकरणामुळे वनविभागात खळबळ उडाली असून आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिलापूरचे क्षेत्र सहायक बारसे यांनी महिला वनरक्षक स्वाती वानखेडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यासंदर्भातील तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारीऱ्यांकडे दाखल केली आहे. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून कारवाईसंदर्भात वर्धा येथील उपवनसंरक्षकांना पत्र पाठविण्याचा आदेश दिला.-बी.एन. स्वामी, सहायक उपवनसंरक्षक, वर्धा वन विभाग.

सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून, महिला वनरक्षकाकडून मला तक्रार प्राप्त झाली. याप्रकरणी चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव उपवनसंरक्षक वर्धा यांना सादर करणार आहे. या अधिकाऱ्यावर कारवाईचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.-आर.बी. गायनेर, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद). 

टॅग्स :forest departmentवनविभाग