शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट शहरात औषधांचा वापर होतोय नशेसाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही.  त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असे म्हटलं जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने प्रतिबंध घातलेल्या गोळ्यांची हिंगणघाट शहरात बेकायदा विक्री सुरू असून या औषधांचा वापर तरुणपिढी नशेसाठी करीत असल्याची माहिती आहे. हिंगणघाट शहरातील काही विक्रेते दहा ते वीस पट किंमत आकारुन या औषधांची विक्री करीत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे सारं घडत असतानाही कारवाई मात्र, कुठेच दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाऊननंतर अनेक नशेखोर गुन्हेगार कंगाल झाले आहेत. चोरी, पाकीटमारी, फसवणूक यासारखे  गुन्हे करून ही मंडळी आपली नशेखोरीच सवय पूर्ण करायची. आता एमडी गर्द खरेदी करणे आवाक्याबाहेर असल्याने ‘नर्वस सिस्टिम’ प्रभावीत करणाऱ्या औषधांचा वापर त्याच्यामध्ये वाढला आहे. दहा ते २० टक्के अधिकची किंमत आकारुन हा व्यवहार सुरू आहे. काही गुन्हेगार तर अनेक दुकानांमधून ही औषधी खरेदी करून साथीदारांना अधिकच्या किमतीत अवैधपणे विकत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. हिंगणघाट शहरात नायट्राेसेनच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. नायट्राेसेनच्या गोळ्या गुंगीकारक असल्याने या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात आहे. औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. खोकल्याची औषधे, झोपेची औषधे, यासाठी वापरली जातात. सराईत गुन्हेगारांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थीही या नशेचे शिकार झाले आहेत. मात्र, आता ‘कुत्ता गोळी’चे पाळेमुळे हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही गोळी अधिक चर्चेत आली. आता तिचे दुष्परिणामही शहरातील गुन्हेगारी जगतात दिसून येत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा गोळ्या देता येत नाही. मात्र, नशेसाठी वापरण्यात येणारी इतरही बरीच औषधे असून त्यातून मोठी उलाढाल होते आहे. याकडे मात्र, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

काय आहे ‘कुत्ता गोळी’?औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापर करण्यास सुरुवात केली. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही.  त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असे म्हटलं जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो.

हिंगणघाट शहरात ‘रॅकेट’ सक्रियहिंगणघाट शहरात मागील काही महिन्यांपासून प्रतिबंधित औषधांची बेकायदा विक्री सुरू आहे. या औषधांचा वापर तरुणाई नशेसाठी करीत असल्याची माहिती असून यातूनच गुन्हेगारी फोफावत चालली आहे. शहरात बेकायदा गोळ्या विक्री करणाऱ्यांचे ‘रॅकेट’ सक्रिय झाले आहे. या गोळ्या नेमक्या शहरात आणत कोण आहे. याची विक्री कुठून होत आहे हे तपासण्याची नितांत गरज आहे. अन्न व औषध विभागाचे याकडे मात्र, दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

अनेक ठिकाणी पोलिसांचे ‘खबरे’ झाले अलर्ट शहरात प्रतिबंधित औषधांचा वापर नशेसाठी सुरू असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनाही असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी जात पाहणी केली. इतकेच नव्हेतर औषधी दुकानांमध्येही जात याबाबतची विचारपूस केली. विक्री होणाऱ्या या गोळ्या नेमक्या येतात तरी कुठून याबाबतचा शोध पोलीस घेत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात ‘खबरे’ देखील कामाला लावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 

टॅग्स :medicineऔषधं