शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हवी औषधी विक्रेत्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्यातही मिळावी अशी अनेकांना अपेक्षा आहे; पण ‘पहिले आप’मध्ये सध्या संवाद अडकला असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे‘पहिले आप’मध्ये अडकला संवाद : संघटनेला पत्राची प्रतीक्षा

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाली. परंतु, त्यावेळी पाहिजे तसा मतदानाचा टक्का वाढला नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. मात्र, विविध संघटनांकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्यातही मिळावी अशी अनेकांना अपेक्षा आहे; पण ‘पहिले आप’मध्ये सध्या संवाद अडकला असल्याचे दिसून येत आहे.वर्धा जिल्ह्यात एकूण ५७५ मेडिकल शॉप आहेत. तर सुमारे १५ जेनेरिक औषधी विक्री केंद्रे आहेत. हे सर्व औषधी विक्रेता एका असोसिएशनच्या माध्यमातून एकजूटही आहेत. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये औषधी विक्रेत्यांचे चांगले जाळे आहे. औषधी विक्रीच्या माध्यमातून त्यांचा अनेक नागरिकांशी संवाद होता. शिवाय, त्यांचे अनेकांशी मैत्रिपूर्ण संबंधही तयार होतात. त्यामुळे जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी नागरिकांशी तयार केलेल्या मैत्रिपूर्ण संबंधाची साथ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणाºया जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदाच होणार आहे. सामाजिक बांधीलकी जोपात विविध संघटनाही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्या तरी त्यांचे प्रयत्न सध्या अपुरेच पडत आहेत.वर्धा जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटना व विविध असोसिएशन तसेच विविध संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तर औषधी विक्रेता असोसिएशन सहकार्य करण्यास तयार आहे. परंतु, या दोघांमधील संवाद पहिले पुढाकार घेईल कोण? यात अडकला आहे.औषध विक्रीवर मिळते कमीत कमी १६ टक्के कमिशनचंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही औषधी विक्रेत्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पाऊल उचलले आहे. तेथे मतदानाच्या दिवशी जो व्यक्ती मतदानाचा हक्क बजावून औषधी खरेदी करण्यासाठी दुकानात येईल त्याला तेथील काही औषधी विक्रेता खरेदी केलेल्या औषधीच्या देयकात १० टक्के सवलत देणार आहेत. विशेष म्हणजे, औषधी विक्रेत्यांना मेडिकल प्रोडक्टवर सरासरी १७ टक्के तर फूड प्रोडक्ट विक्रीतून १० टक्के मार्र्जिन मिळते. चंद्रपुरात राबविण्यात येणाºया उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक औषधी विक्री केंद्रावर मतदानाचा हक्का बजावणाºया व्यक्तीला बोटावरची शाई दाखविल्यावर औषधीवर कमीत कमी १० टक्के सवलत मिळाल्यास मतदानाचा टक्का वाढविण्यास नक्कीच फायदा होणार आहे.मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून विविध सामाजिक संघटना, संघटना व असोसिएशनला आम्ही आवाहन केले आहे. दोन दिवसांत त्यांचे मत आम्हाला कळणार आहे.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. ही काळाची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला लेखी पत्र मिळाल्यास त्यावर चर्चा करून तत्काळ योग्य निर्णय घेण्यात येईल.- नवल मानधनिया, अध्यक्ष, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वर्धा.

 

टॅग्स :wardha-acवर्धा