शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या कोडगेपणानंतर चालकाची सतर्कताच आली कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:07 IST

राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या खाली उतरली.

ठळक मुद्देभरधाव बसचे स्टेअरिंग झाले फ्री। ५५ प्रवासी थोडक्यात बचावले, दोन तास उन्हात ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या खाली उतरली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला. ही घटना शनिवारला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली असून महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वर्धा आगाराची हिंगणघाटमार्गे नागपूरकडे जाणारी एमएच ४० वाय ५४३८ क्रमांकाची बस नादुरुस्त असल्याने ती चालविणे शक्य नाही, असे चालकाने आगारातील वरिष्ठांना सांगितले. तरिही वरिष्ठांनी दुर्लक्ष करुन तिच बस नागपूरकडे नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे चालक प्रवीण लक्ष्मण काळसर्पे व वाहक अर्चना देवगीरकर ५५ प्रवाशी घेऊन नागपूरकडे निघाले. सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ या बसचे स्टेअरिंग अचानक फ्री झाल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चालक काळसर्पे यांनी बसवरील नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला. सर्व प्रवाशांना बाहेर काढून चालकाने आगारातील वरिष्ठांची संपर्क साधत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. परंतु कोडग्या अधिकाºयांनी तब्बल दोन तासानंतर बस पाठविल्याने प्रवाशांना उन्हात ताटकाळत उभे राहावे लागले. यात लहान बालकांसह वृद्ध व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. 

टॅग्स :state transportएसटी