शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लढा उभारा

By admin | Updated: April 14, 2016 02:45 IST

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे.

महेश मात्रे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सववर्धा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित राजकीय नेतृत्वात आंबेडकरी नेत्यांना अनेकदा संधी मिळाली; पण सामाजिक व आर्थिक लढा अद्याप अपुरा आहे. तो पूर्ण केल्याशिवाय सर्वांगीण प्रगतीची दारे खुली होणार नाही. तेव्हा बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचा लढा उभारावा, असे आवाहन आयबीएन लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक महेश मात्रे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्त शहर समितीतर्फे मंगळवारी पोलीस मैदान येथे आयोजित पर्व दिन सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अर्थतज्ञ श्रीकांत बारहाते, माजी जि.प. सदस्य विजय आगलावे, आयबीएन लोकमत मुंबईचे विनोद राऊत, समिती संयोजक अतुल दिवे, अध्यक्ष विशाल रामटेके, जनसंपर्क प्रमुख महेंद्र मुनेश्वर विचार मंचावर उपस्थित होते.दीक्षाभूमी व चैत्यभूमी आंबेडकरी अनुयायांची प्रेरणाभूमी-बारहातेवर्धा : नागपूरची दिक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी या दोन्ही आंबेडकरी अनुयायांची प्रेरणाभूमी आहे. वर्धाच्या या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती सोहळा मन भारावणारा आहे. या भूमीतून आंबेडकरी अनुयायांना अशीच प्रेरणा मिळत राहो, असे मत बारहाते यांनी व्यक्त केले. मान्यवरांचा परिचय विनोद राऊत यांनी करून दिला. प्रास्ताविक व संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले तर आभार अतुल दिवे यांनी मानले. शहर उत्सव समितीतर्फे संयोजक प्रमोद राऊत यांनी अतिथींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. युवप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. याप्रसंगी सर्वत्र जयभीमचा नारा गुंजला. विचार मंचावरील प्रेम धांदे मुंबई, साधना मेश्राम पुणे व संच यांच्या मार्गदर्शनात सादर झालेल्या बुद्ध, भीम गीतांच्या प्रबोधनाने वातावरण मंगलमय झाले. संपूर्ण पोलीस मैदान आंबेडकरी कार्यकर्त्यांनी फुलले होते. कार्यक्रमाला पंकज लभाने, नितीन कुंभारे, आशिष सोनटक्के, सुरेंद्र पुनवटकर, संदेश भित्रे, राजू वैद्य, रत्नमाला साखरे, अविनाश नागदेवते, आकाश पाझारे, आदित्य मांडाळे, बादल शेळके, प्रदीप भगत, अमित गजभिये, आशिष लोखंडे, अक्षय फुलझेले, प्रणीत मानकर, प्रदीप ठोंबरे, सोनू सहारे, संदीप नगराळे, राहुल पिंपळकर, बाबा बडगे व समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)