शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:57 IST

पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था राखण्याचे शांतता समितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होवू नये, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टरर्स लावणार नाही. घोषणा देणार नाही, अशा सूचना केल्या.प्रास्ताविक देवळीचे ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी केले. देवळी शहर व तालुक्यातील गावातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरीता सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. डॉ. आंबेडकर यांचे आदर्श विचार लोकांनी अंगीकारावे अशी उपस्थितांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांनी शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पाडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेला ७० ते ८० जयंती मंडळाचे सदस्य, पोलीस मित्र आणि पोलीस पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला मिश्रा, ढुमणे, बुटे, पवन झाडे यांनी सहकार्य केले.शांतता समितीची सभातळेगाव (श्या.पं.) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती सर्व समाजबांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या महत्वपूर्ण दिवसाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी पोलीस स्टेशन तळेगावचे ठाणेदार सुरेश भोयर यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला तळेगाव ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुण युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार भोयर यांनी सर्व पोलीस पाटलांना आवश्यक त्या सूचना केल्या तसेच सर्व ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकी शांततेत निघेल. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे सांगितले. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रास्ताविक ठाणेदार भोयर यांनी केले. आभार दक्षता कमेटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जोरे यांनी मानले. सरपंच सुनीता जोरे, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. पीएसआय राठोड, परवेज खान, निलेश पेठकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती