शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्धधम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. बाबासाहेबांचे विचार या देशातील सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संपूर्ण आंबेडकरी अनुयायाची आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर मुंबई यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भदन्त राजरत्नद्वारे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. धम्म विचार मंचावर परिषदेचे अध्यक्ष भदन्त आनंद महाथेरो दिल्ली, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मुन्नी भारती, दिल्ली परिषदेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे, अनिल जवादे हिंगणघाट, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. शुभाष खंडारे, डॉ. सुधाकर सोनोने, प्राचार्य डॉ. सुनील तोतडे, निरज गुजर, नयन सोनवणे, अविनाश पाटील, उमेश म्हैसकर, किशोर खैरकार, अजय मेहरा, रूपचंद भगत, गजानन दिघाडे, धर्मपाल ताकसांडे, गोरख भगत, सुरेश उमरे, महेंद्र कांबळे, संजय कांबळे, सरला भिमटे, दीपचंद घनमोडे, भिक्खू व भिक्खूनी संघ उपस्थित होते.उद्घाटन सत्रात समाजसेवक सुहास थूल व विशाल मानकर यांचा भदन्त आनंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते तथागत बुद्ध मूर्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह शाल देऊन करण्यात आला. सायंकाळी कृतिका बोरकर व रसिका बोरकर मुंबई यांचा भीम-बुद्ध गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. परिषदेला दहा हजार पेक्षा अधिक समाज बांधव उपस्थित होते.प्रास्ताविक आयोजक भदन्त राजरत्न यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार मुकूंद नाखले यांनी मानले. परिषदेला गौतम पानतावणे, नितीन जुमडे, सचिन माटे, किशोर कांबळे, वंदना पाटील, रेखा सोनवणे, निरज ताकसांडे, सीतम मंदरेले, ताराचंद पाटील, सचिन थूल, अमित देशभ्रतार, निलेश ओंकार, आकाश चतुरपाळे आदींनी सहकार्य केले.बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाजाकरिता महत्त्वाचे कार्य केलेले आहे. यामुळे बाबासाहेबांचा केवळ जयजयकार करून चालणार नाही तर त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, अशी मते बौद्ध धम्म परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली. परिषदेला उपस्थित असंख्य समाज बांधवांनीही यास प्रतिसाद देत संकल्प केला.