शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचा बाप आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:08 IST

गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली आहे.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली आहे. एकीकडे प्रधानमंत्री असे बोलत आहे तर दुसरीकडे त्यांचे सहकारी मंत्री राज्यघटना बदलण्याबाबत बोलून समाजात दुफळी माजविण्याचे काम करीत आहे, असे मत लाँग मार्चचे प्रणेते आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.नगर परिषद व डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत आहे. अध्यक्षस्थानी आमदार रणजीत कांबळे तर अतिथी म्हणून न.प. सदस्य गौतम पोपटकर, सुनील बासू, पवन महाजन, सुरेश वैद्य, अश्विनी काकडे, मोहन अग्रवाल, दादा मून, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे आदी उपस्थित होते.प्रा. कवाडे पूढे म्हणाले की, बहुजन समाजातील थोर समाजसेवक व उच्च कोटीच्या संतांना त्यांच्या जातीपुरते मर्यादित ठेवण्याचे महापाप आजच्या समाजव्यवस्थेत होत आहे. या देशात उपेक्षित ठरलेल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी डॉ. आंबेडकर यांचे कार्य राहिले आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी समस्त समाज व्यवस्थेचा उद्धार केला आहे. असे असताना त्यांना दलितांचा नेता म्हणून मर्यादित ठेवण्यामागे मनुवादी प्रवृतीचे षडयंत्र आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.सर्वप्रथम मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. संचालन प्रशांत चहारे यांनी केले तर आभार अंशुल कांबळे यांनी मानले. याप्रसंगी भिमा कोरेगाव शौर्यस्तंभाच्या उभारणीसाठी आर्थिक सहभाग देणारे गौतम पोपटकर, दादा मून, नगराळे, भगत व इतरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुनिया मे भिमजी महान हा भिमगीतांचा कार्यक्रम मिलिंद जाधव व जाधव सिस्टर्स यांनी सादर केला. कार्यक्रमाला महेंद्र खंताडे, सम्राट भगत, राष्ट्रपाल पोपटकर, प्रमोद कांबळे व नागरिक उपस्थित होते.डॉ. आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ -रणजीत कांबळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सर्वधर्म समभावातून समस्त समाज व्यवस्थेला प्रेरणा देणारे ते महामानव होते. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळेच विशाल देशातील लोकशाही मजबूत मानली गेली आहे. यामुळे बाबासाहेबांचे विचार सर्व समाज बांधवांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती