ई. झेड. खोब्रागडे : डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाला प्रारंभवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न आहेत. भारतीय संविधानाची प्रस्तावना आज संपूर्ण देश वाचून त्यांना कोटी-कोटी वंदन करतो आहे. डॉ. आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय चिकित्सक होते, असे मत माजी जिल्हाधिकारी तथा आंबेडकरी विचारवंत ई.झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शहर समितीतर्फे आयोजित चार दिवसीय डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य जयंती महोत्सवाला क्रांतीबा ज्योतीबा फुले जयंती कार्यक्रमाने थाटात प्रारंभ झाला. डॉ. आंबेडकर, म. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते संबोधित करीत होते. विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे युवा अभ्यासक व आयबीएन लोकमत मुंबईचे संपादक विनोद राऊत, डॉ. आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके, संयोजक प्रमोद राऊत, अतुल दिवे विराजमान होते. प्रास्ताविक व संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले. डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चारित्र्यातील महत्त्वाचे क्रांतिकारी विचाराचे चवदार तळे सत्याग्रह, धम्मदीक्षा समारोह व संविधान सोहळा आदी उत्तीस शिल्पाची बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील समितीच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. उत्तीस शिल्प देखावा बनविणारे कलाकार नंदू तिवसकर रा. गोपाळनगर नागपूर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. पंकज लभाने, नितीन कुंभारे, आशिष सोनटक्के, प्रदीप भगत, संदेश भित्रे, आकाश पाझारे, अविनाश नागदेवते, आदित्या मांडाळे, बादल शेळके, अमित गजभिये, आशिष लोखंडे, प्रणीत मानकर, अक्षय फुलझेले, प्रदीप ठोंबरे, सोनु सहारे, संदीप नगराळे, राहुल पिंपळकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय चिकित्सक
By admin | Updated: April 13, 2016 02:18 IST